Batman Squad : रेल्वेचे ‘बॅटमॅन’ रात्रीचे तैनात, बॅटमॅन पथकाकडून तिकीट तपासणी

1258
Batman Squad : रेल्वेचे 'बॅटमॅन' रात्रीचे तैनात, बॅटमॅन पथकाकडून तिकीट तपासणी
Batman Squad : रेल्वेचे 'बॅटमॅन' रात्रीचे तैनात, बॅटमॅन पथकाकडून तिकीट तपासणी

रात्रीच्या सुमारास विनातिकीट प्रवास करणाऱ्याची संख्या वाढत असल्यामुळे पश्चिम रेल्वेने रात्रीच्या वेळी तिकीट तपासणीसाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. हे पथक ‘बॅटमन(‘BATMAN’ Squad) या नावाने ओळखले जाणार असून मागील काही दिवसापासून हे बॅटमॅन पथक रात्रीच्या वेळी पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांचे तिकीट तपासणी करीत आहे. रात्रीच्या सुमारास अचानक सुरु तिकीट तपासणीमुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकटयांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. या बॅटमन पथकाने मागील दोन दिवसात २हजार३४५ फुकट्या प्रवाशाकडून जवळपास साडेसहा लाख रुपयांचा दंड जमा केला आहे. (Batman Squad)

(हेही वाचा- Shivsanwad Parishad : हिंदवी स्वराज्याचे राष्ट्र उभारणीतील योगदान उलगडणार ‘शिवसंवाद परिषद’)

पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) उपनगरीय ट्रेनमधून रात्रीच्या सुमारास विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे, तसेच रात्रीच्या सुमारास सेकंड क्लास तसेच विनातिकीट प्रवाशी सर्रासपणे ‘फर्स्टक्लास’च्या डब्यातून तसेच ‘एसी लोकल’ मधून प्रवास करीत असल्यामुळे फर्स्ट क्लास आणि एसी लोकलमध्ये रात्रीच्या वेळी गर्दी बघायला मिळत आहे. प्रवाशाकडून याबाबत अनेक तक्रारी पश्चिम रेल्वेकडे आल्यामुळे अखेर पश्चिम रेल्वेने रात्रीच्या सुमारास तिकीट तपासनीसचे १०० जणांचे एक पथक तयार केले आहे, या पथकाला ‘बॅटमन पथक’ असे नाव देण्यात आले आहे. या पथकात पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल विभागाचे दक्ष तिकीट तपासणी (TC)आहेत. विशेषत: हे बॅटमॅन रात्रीच्या वेळी, शेवटच्या लोकल ट्रेन पर्यत तिकीट तपासणीचे काम करणार आहे. वेळ प्रसंगी हे पथक लांबपल्ल्याच्या गाड्यातुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे देखील तिकिटे तपासतील. (Batman Squad)

पश्चिम रेल्वेनुसार (Western Railway) रात्रीच्या वेळी कार्यान्वित, (Batman Squad) पथकाने सुरुवातीच्या दोन रात्रीतुन विनातिकीट प्रवास करणाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला आहे. ११ मार्च ते १२ मार्च च्या रात्री बॅटमन पथकाने २३४५ फुकट्या कडून ६लाख २९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. (Batman Squad)

(हेही वाचा- One Nation One Election : सरकार पडले, मध्यावधी निवडणुका झाल्या तर…; काय आहेत अहवालातील ठळक वैशिष्ट्ये?)

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांच्या मते, ‘बॅटमॅन’ पथकाला( Batman Squad) रात्रीच्या वेळी काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची भूमिका गाड्यांची तपासणी करणे आणि कोणत्याही समस्या किंवा संशयास्पद क्रियाकलापांच्या चिन्हेसाठी सतर्क राहणे आहे. या मोहिमेचे नियमित प्रवाशांकडून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या तिकीट तपासणी पथकाला ‘बॅटमॅन’ हे नाव एका प्रवाशाने दिले आणि हेच नाव रेल्वेकडून कायम करण्यात आले आहे. (Batman Squad)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.