Bank Strike : बँक कर्मचारी डिसेंबरपासून १३ दिवस संपावर

111
Bank Strike : बँक कर्मचारी डिसेंबरपासून १३ दिवस संपावर
Bank Strike : बँक कर्मचारी डिसेंबरपासून १३ दिवस संपावर

गेल्या काही वर्षांपासून बँक कर्मचाऱ्यांचे केंद्रातील सत्ताधाऱ्यांशी खटके वाजत आहे. कोणत्या ना कोणत्या कारणावरुन त्यांच्यात बिनसत आहे. त्यावर काही तोडगा निघत नाही. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी वारंवार बंदचे हत्यार उपसावे लागत आहे. केंद्र सरकार आणि बँक संघटनेत संवाद होत नाहीत का? संघटनांच्या मागण्या सरकारला पटत नाहीत का की त्यांना त्या समजूनच घ्यायच्या नाहीत. कर्मचाऱ्यांनी या वर्षाच्या शेवटी आणि नवीन वर्षांत बंदची हाक दिली आहे. बँक कर्मचारी डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत १३ दिवस संपावर जाणार आहेत. काय आहेत त्यांच्या मागण्या? (Bank Strike)

याबाबतची अधिसूचना ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशनने जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार ४ डिसेंबर २०२३ ते २० जानेवारी २०२४ या कालावधीत विविध तारखांना हा संप करण्यात येणार आहे. या काळात देशातील विविध बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. (Bank Strike)

(हेही वाचा : Devendra Fadnavis : दिल्लीमध्ये संधी मिळणार? देवेंद्र फडणवीस याबद्दल स्पष्टच बोलले)

कोणत्या बँकेचा संप कोणत्या दिवशी?

ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशनच्या अधिसूचनेनुसार, डिसेंबर ते जानेवारी या सर्व तारखांना विविध बँकांमध्ये अखिल भारतीय संप होणार आहे.
डिसेंबरमध्ये ‘या’ तारखांना बँक कर्मचारी संप करणार

४ डिसेंबर – PNB, SBI आणि पंजाब अँड सिंध बँक

५ डिसेंबर- बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडिया

६ डिसेंबर- कॅनरा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया

७ डिसेंबर- इंडियन बँक आणि युको बँक

८ डिसेंबर- युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र

११ डिसेंबर- खासगी बँकांचा संप

जानेवारीत ‘या’ तारखांना संप होणार

२ जानेवारी- तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पुद्दुचेरी, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपमध्ये सर्व बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.

३ जानेवारी- गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दादर, दमण आणि दीवमधील सर्व बँकांमध्ये संप असेल.

४ जानेवारी- राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील सर्व बँकांमध्ये संप.

५ जानेवारी- दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील सर्व बँकांमधील कर्मचाऱ्यांचा संप असेल.

६ जानेवारी- पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील सर्व बँकांचा संप.

१९ आणि २० जानेवारी- या दोन तारखांना देशभरातील सर्व बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.

‘या’ आहेत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या

बँक कर्मचाऱ्यांनी तीन मागण्या केल्या आहेत. यातील पहिली मागणी आहे की, सर्व बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात स्टाफची नियुक्ती करण्यात यावी. दुसरी मागणी म्हणजे बँकांमधील कायमस्वरूपी नोकऱ्यांचे आऊटसोर्सिंग बंद करण्यात यावे आणि तिसरी मागणी म्हणजे आउटसोर्सिंगशी संबंधित सेटलमेंटमधील तरतुदी आणि त्याचे उल्लंघन थांबवावे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.