Smriti Irani : दिवाळी भेट बनली वादाचा मुद्दा

निवडणुक आली की राजकीय नेत्यांना जनतेची आठवण येते. त्याचप्रमाणे त्यांना आनंदी करण्यासाठी विशेष उपक्रम राबविले जातात.

157
Smriti Irani : दिवाळी भेट बनली वादाचा मुद्दा
Smriti Irani : दिवाळी भेट बनली वादाचा मुद्दा

निवडणुक आली की राजकीय नेत्यांना जनतेची आठवण येते. त्याचप्रमाणे त्यांना आनंदी करण्यासाठी विशेष उपक्रम राबविले जातात. अगदी तसाच काहीसा प्रकार सदासर्वकाळ दुर्लक्षित राहिलेल्या उत्तर प्रदेशातील अमेठीमधील जनतेसोबत घडला आहे. अगदी दिवाळीच्या तोंडावर अमेठीवासियांची आठवण कॉंग्रेसचे राजकुमार राहुल गांधी यांना झाली. तेव्हा त्यांनी अमेठीमधील पाच हजार कॉंग्रेस कार्यंकर्त्यांना दिवाळी भेट दिली. मात्र या दिवाळी भेटीची चर्चा राजधानीतील कॉंग्रेस मुख्यालयात रंगली आहे. (Smriti Irani)

दरम्यान अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांनी देखील अमेठी मधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह आम जनतेमध्ये देखील दिवाळी भेट वितरीत केली. एक लाख पेक्षा जास्त लोकांना ही दिवाळी भेट स्मृती इराणी यांनी दिली आहे. यामुळे अमेठी वासियांना मिळालेल्या या दिवाळी भेटीची चर्चा देखील भाजप मुख्यालयात चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. तर साहजिकच राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्या दिवाळी भेटीची तुलना करण्यात आली तेव्हा येथेही राहुल गांधी यांना स्मृती इराणी यांनी मात दिली. एकुणच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणजेच ही दिवाळी भेट असल्याचे बोलले जात आहे. या मध्ये मोबाइल, मातीच्या पणत्या, मिठाई, वॉलक्लॉक, टिफीन, साडी, पुस्तक अशा अनेक वस्तुंचा समावेश या दिवाळी भेटीमध्ये होता. (Smriti Irani)

(हेही वाचा – MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १७ वर्षांचा इतिहास आणि काय आहे भविष्य?)

खरंतर उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी यांनी २०२४ मध्ये राहुल गांधी अमेठीमधुन लढणार असल्याचे म्हटले होते, यामुळे या दिवाळी भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. यावर बोलताना भाजपचे जिल्हा अध्यक्ष राम प्रसाद मिश्र म्हणाले की, स्मृती इराणी दीदी अमेठीवासियांना आपले कुटुंब मानते. यामुळे त्यांनी दिवाळी भेट वाटुन अमेठीवासियांसोबत आपला आनंद व्यक्त केला. दिवाळी भेट वितरीत करताना कुणासोबतही कुठलाही भेदभाव करण्यात आला नाही. एक लाख पेक्षा जास्त कुटुंबापर्यंत ही दिवाळी भेट पोहोचली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावर बोलताना कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप सिंघल म्हणाले की, राहुल गांधी यांना सणांचे महत्व लक्षात घेऊन सर्वांना दिवाळी भेट दिली. यात त्यांनी फक्त भारतीय परंपरा जपली आहे. राजकारण करण्यासारखे काहीच नाही. एक मात्र खरं की, लोकसभा निवडणुकीला समोर ठेऊनच यावर्षी अमेठीवासियांची दिवाळी गोड करण्यात आली आहे. यामुळे येणारी लोकसभा निवडणुक अमेठीवासियांना भेट देणारी ठरली असून मतदारांना आकर्षित करणारी ठरली आहे. (Smriti Irani)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.