Devendra Fadnavis : दिल्लीमध्ये संधी मिळणार? देवेंद्र फडणवीस याबद्दल स्पष्टच बोलले

44
Devendra Fadnavis : दिल्लीमध्ये संधी मिळणार? देवेंद्र फडणवीस याबद्दल स्पष्टच बोलले
Devendra Fadnavis : दिल्लीमध्ये संधी मिळणार? देवेंद्र फडणवीस याबद्दल स्पष्टच बोलले

सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या दिल्लीत जाण्याच्या चर्चा अनेक वर्षांपासून रंगल्या आहेत.या चर्चेवर आता स्वत: देवेंद्र फडणवीसांनीच पडदा टाकला आहे. मी विधानसभा निवडणूक लढवणार आणि ते ही नागपूर मधूनच लढवणार असं म्हणत फडणवीसांनी चर्चांना पूर्णविराम दिला. (Devendra Fadnavis)

गेल्या काही वर्षांत देवेंद्र फडणवीस हे राज्यात भाजपाचा आश्वासक चेहरा म्हणून उदयास आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नागपुरातून उमेदवारी दिली जाणार की दिल्लीला जाणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या. मात्र या संदर्भातच फडणवीस स्पष्टच बोलले ते म्हणाले की, ‘मी विधानसभा लढवणार आणि तेही नागपूरमधूनच लढवणार आहे. पुढचे १० वर्षे तरी मी भारतीय जनता पक्षामध्ये असेल. तसेच पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार आहे.’ देवेंद्र फडणवीस हे नैऋत्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यामुळे पुढेही ते याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा : Uddhav Thackeray Election Commission : उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगावर आरोप; आता आचारसंहिता बदलली का ?)

माझ्याबद्दलचा निर्णय पक्ष घेतो
यापूर्वीही त्यांना पत्रकारांनी हा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले होते की ,तुम्ही दिल्लीत जाण्यास उत्सुक आहात का? की तुम्हाला महाराष्ट्रातच काम करायला आवडेल? असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पहिली गोष्ट अशी आहे की, पक्ष जेव्हा म्हणेल दिल्लीत यावं लागेल, तेव्हा दिल्लीत जाईन. ज्यादिवशी पक्ष सांगेल की मुंबईत राहायचंय. तेव्हा मुंबईत राहीन. जेव्हा पक्ष म्हणेल, आता तुझी आवश्यकता नाही, तू नागपूरला जा, तेव्हा मी नागपूरला निघून जाईल. मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे. पक्षच माझ्याबद्दल निर्णय घेतो. मी स्वत: निर्णय घेत नाही. त्यामुळे माझ्या उत्सुकतेचा विषयच येत नाही.”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.