Amitabh Bachchan : बिग बींच्या ट्विटमुळे भाजपा आणि आदित्य ठाकरे आमने-सामने!

393
Amitabh Bachchan : बिग बींच्या ट्विटमुळे भाजपा आणि आदित्य ठाकरे आमने-सामने!
Amitabh Bachchan : बिग बींच्या ट्विटमुळे भाजपा आणि आदित्य ठाकरे आमने-सामने!

अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. एखाद्या ट्वीटचा क्रमांक चुकल्यास चाहत्यांकडे दिलगिरी व्यक्त अमिताभ दुरुस्ती करत सुधारीत ट्वीट क्रमांक सांगतात. यातच आता, अमिताभ बच्चन यांच्या ट्विटमुळे भाजपा आणि आदित्य ठाकरे यांच्यात ट्विटर वॉर रंगले आहे. (Amitabh Bachchan)

(हेही वाचा- PM Narendra Modi: ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या संकट आलं तर मदतीला पहिले धावून जाईन: पंतप्रधान मोदी)

अमिताभ बच्चन यांचे ट्वीट काय?

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे आपल्या ट्वीटर अकाउंटवर आपले नवे प्रोजेक्ट्सशिवाय एखादी नवीन माहिती, त्यांना आलेले अनुभव शेअर करत असतात. अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी (२ मे) एक ट्वीट केले. एका कामानिमित्त दक्षिण मुंबईत आले असताना त्यांनी कोस्टलरोडद्वारे मरीनड्राइव्ह ते जुहू प्रवास 30 मिनिटात केला. त्यावर व्यक्त होताना, ‘वाह ! क्या बात है ! साफ सुथरी, नयी बढिया सडक कोई रुकावट नही..’ याबाबत त्यांनी ‘X’ वर पोस्ट केली. काही दिवसांपूर्वींदेखील अमिताभ यांनी दक्षिण मुंबईहून घरी जाताना कोस्टल रोडचा वापर केला होता. त्याचा व्हिडीओही पोस्ट केला होता. (Amitabh Bachchan)

 अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी पोस्ट केलेल्या ट्वीटला भाजप महाराष्ट्रकडून आज हमारे पास ‘कोस्टल रोड’ है…असे म्हणत अमिताभ यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र (pm narendra modi) मोदींच्या नेतृत्वात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यामुळेच मुंबईकरांचा प्रवास वेगवान होत असल्याचे म्हटले.

यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी कोस्टल रोडच्या निर्मितीपासून ते आतापर्यंतचा घटनाक्रम सांगितला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोस्टल रोडचं काम किती वेगाने सुरू होतं हे सांगताना भाजपचं यात काही योगदान नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. (Amitabh Bachchan)

हेही पहा-  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.