VIVO V30e : काही भन्नाट ऑफरसह विवोचा व्ही३०ई फोन अखेर भारतात लाँच 

VIVO V30e : ५० जीबीचा कॅमेरा, ४४ वॅट्‌सचं फास्ट चार्जिंग असलेला विवोचा फोन बाजारात आला आहे 

230
VIVO V30e : काही भन्नाट ऑफरसह विवोचा व्ही३०ई फोन अखेर भारतात लाँच 
VIVO V30e : काही भन्नाट ऑफरसह विवोचा व्ही३०ई फोन अखेर भारतात लाँच 
  • ऋजुता लुकतुके

विवो फोनची वी३० (VIVO V30e) मालिका मार्च महिन्यात भारतात लाँच झाली आहे. वी३० आणि वी३० प्रो अशी दोन मॉडेल सुरुवातीला बाजारात आली होती. त्यात आला विवो व्ही३०ई या नवीन फोनचा समावेश झाला आहे. ५० जीबीचा कॅमेरा आणि ४४ वॅटचं फास्ट चार्जिंग ही फोनची सगळ्यात मोठी वैशिष्ट्य असणार आहेत. आणि हे मोलाचे फिचर तुम्हाला २७,९९९ रुपये ते २९,९९९ रुपयांमध्ये मिळणार आहे.  (VIVO V30e)

(हेही वाचा- PM Narendra Modi: ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या संकट आलं तर मदतीला पहिले धावून जाईन: पंतप्रधान मोदी)

या फोनचा डिस्प्ले ६.७८ इंचांचा एमोल्ड डिस्प्ले आहे. आणि त्याची प्रखरता इतकी आहे की, चित्रपट, वेबसीरिज, तुमचा लाडका गेम आणि इतर कुठलाही आवडता मजकूर तुम्ही इथं स्पष्टपणे पाहू शकता. गेमिंगचा अनुभव तर खूपच चांगला असेल. ५० मेगा पिक्सलचा मूलभूत कॅमेरा, तेवढ्याच क्षमतेची अल्ट्रा वाईड लेन्स आणि ५० मेगा पिक्सलचीच टेलिफोटो लेन्स ही बारकाईने फोटो टिपण्यासाठी सक्षम आहे. या व्यतिरिक्त या फोनमधील सेल्फी कॅमेराही ५० मेगा पिक्सल क्षमतेचाच आहे. (VIVO V30e)

क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ व्या पिढीचा दुसरा प्रोसेसर या फोनमध्ये वापरण्यात आलाय. त्यामुळे गेमिंगसाठी हा फोन चांगला आहेच. शिवाय एकाच वेळी अनेक ॲप बिनदिक्कत वापरण्याची कामगिरी हा फोन चोख बजावू शकतो. त्यासाठी १२ जीबीची रॅमही यात देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज क्षमता २५६ जीबींची आहे. (VIVO V30e)

(हेही वाचा- Amitabh Bachchan : बिग बींच्या ट्विटमुळे भाजपा आणि आदित्य ठाकरे आमने-सामने!)

फोनची बॅटरी ५,००० एमएएच इतकी आहे. त्यामुळे एकदा चार्ज केल्यावर फोन तीन दिवसही चालू शकतो. आणि सगळी ॲप वापरात असतानाही फोन दिवसभर चालू शकतो. शिवाय फोनबरोबर येणारा ८० वॅट क्षमतेचा रॅपिड चार्जर तर फोनचा युएसपी आहे. अर्ध्या तासात हा चार्जर फोन पूर्णपणे चार्ज करू शकतो. तर फोनमधील अँड्रॉईड १४ ऑपरेटिंग प्रणालीही सध्याची बाजारातील सगळ्यात सक्षम प्रणाली आहे.  (VIVO V30e)

या फोनचं ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेलं व्हर्जन २७,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. तर तर सगळ्यात जास्त १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत २७,९९९ रुपये इतकी आहे. (VIVO V30e)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.