BMC : वांद्रे- सांताक्रूझ परिसरात पुढील आठवड्यात ‘हे’ चार दिवस पाणी येणार ‘थेंब थेंब’

424
सांताक्रूझ (पूर्व) येथील टीचर्स कॉलनी स्‍मशानभूमी नजिकच्‍या १ हजार २०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनीचे पुनर्वसन आणि मजबुतीकरणाचे काम मुंबई महानगरपालिकेच्‍या जल अभियंता खात्‍यातर्फे हाती घेण्यात येणार आहे. तसेच, हंसबुर्गा रोड पुलाखालील वैतरणा जलवाहिनीवरील गळती दुरूस्‍तीचेही काम केले जाणार आहे. या कामांमुळे रविवारी, ४ जून २०२३ ते गुरुवार, ८ जून २०२३ दरम्‍यान एच/पूर्व विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.
रविवार, ४ जून २०२३ ते गुरुवार, ८ जून २०२३ दरम्‍यान पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ (पूर्व) परिसरात जलवाहिनी दुरूस्‍तीची दोन प्रमुख कामे केली जाणार आहेत. या कामांमुळे एच/पूर्व परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी, या कालावधीत अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
वांद्रे ते सांताक्रूझ पूर्व (एच/पूर्व )विभागातील पाणीपुरवठा कमी दाबाने होणा-या परिसरांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे.
  • रविवार, ४ जून २०२३ : वांद्रे-कुर्ला संकुल येथील पाणीपुरवठा सकाळी ८.३० ते १०.४५ वाजेपर्यंत होईल.
  • सोमवार, ५ जून २०२३ : संपूर्ण एच/पूर्व विभागात पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.
  • मंगळवार, ६ जून २०२३ : संपूर्ण एच/पूर्व विभागात पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.
  • सोमवार, ५ जून २०२३ ते गुरुवार, ८ जून २०२३ : एच/पूर्व विभागातील भारत नगर, वाल्मिकी नगर, महाराष्‍ट्र नगर, वांद्रे -र्ला संकुल येथे पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.