PFI चेच काम वेगळ्या नावाने सुरू! हिंदुत्वनिष्ठ नेते, पत्रकार दहशतवाद्यांच्या रडारवर

'हिंदू प्रोफाइल डॉट कॉम' चा संबंध अमेरिकेत कार्यरत असलेल्या इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिलशी आहे.

197
  • करुणाशंकर तिवारी

सध्या सोशल मीडिया आणि वेबसाईटच्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठ नेत्यांची यादी जाहीर केली जात आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख, केंद्रीय मंत्री, हिंदु धर्मोपदेशक यांच्यासह पत्रकारांची नावे आहेत. या यादीत या सर्वांचे शिक्षण, त्यांची मते यांसह त्यांची वैयक्तिक माहितीही देण्यात आली आहे. अशा रीतीने केरळमधील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांचे प्रोफाइल बनवण्याच्या दहशतवादी संघटना PFI ने सुरु केलेल्या कामाला आता जागतिक स्वरूप आल्याचे दिसत आहे.

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या दहशतवादी संघटनेवर बंदी घातली आहे. देशभरात बॉम्बस्फोट, दंगली भडकावणे, धर्मांतर करणे आणि तरुणांना परदेशात दहशतवादी म्हणून पाठवणे यात पीएफआयचा हात होता. संघटनेने केरळमधील हिंदुत्वनिष्ठ नेते आणि आरएसएसशी संबंधित नेत्यांचे प्रोफाइल बनवले होते. त्यानुसार त्या नेत्यांवर नियोजनाबद्धपणे हल्ले केले जात होते. पीएफआयवरील बंदीनंतर आता हिंदू प्रोफाइल डॉट कॉम (hinduprofiles.com) हे काम करत आहे. ही वेबसाइट भारतातील प्रमुख हिंदुत्वनिष्ठ नेते, संघटना प्रमुख, पत्रकार यांची माहिती सार्वजनिक करत आहे. या वेबसाइटमध्ये असे लिहिले आहे की, ही वेबसाइट भारत आणि परदेशातील हिंदुत्वनिष्ठ आणि इतर धर्मियांविषयी द्वेष पसरवणाऱ्यांच्या माहितीचे संकलन करत आहे. यामध्ये द्वेष पसरवणारे आणि दुसरे खूप खतरनाक असे दोन वर्ग करण्यात आले आहेत. ज्यामध्ये हिंदुत्वनिष्ठ नेते, पत्रकार, साधू-साध्वी इत्यादींची नावे आणि त्यांची माहिती देण्यात आली आहे.

(हेही वाचा Delhi University : दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात वीर सावरकरांचा समावेश करण्याचा प्रस्ताव; रणजित सावरकरांनी केले स्वागत)

कोणाचे नाव आहे?

हिंदू प्रोफाइल वेबसाइट आणि ट्विटर अकाउंटमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, पत्रकार दीपक चौरसिया, अमन, सनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवले, हिंदू जनजागृती समितीचे रमेश शिंदे, मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, सत्यपाल सिंह यांच्यासह अनेकांची यात नावे आहेत. त्यात त्यांची सर्व माहिती दिली आहे.

दहशतवादी संघटनांशी संबंध 

हिंदू प्रोफाइल डॉट कॉम यांचा संबंध अमेरिकेत कार्यरत असलेल्या इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल यांच्याशी आहे. कारण या संघटनेने हिंदू प्रोफाइल डॉट कॉम संकेतस्थळाने केलेले ट्विट त्यांच्या सर्व सोशल मीडियाच्या व्यासपीठावरून प्रसारित केले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.