Veer Savarkar : वीर सावरकरांचे विचार आचरणात आणणे हीच त्यांना खरी मानवंदना – रणजित सावरकर

रणजित सावरकर यांनी 'हिंदुत्वाची १०० वर्षे' या विषयावर मतप्रदर्शन करतांना चालू घडामोडींवरही कटाक्ष टाकला.

108

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नुसता जयजयकार करून चालणार नाही तर त्यांचे विचार आचरणात आणणे हीच त्यांना खरी मानवंदना असल्याचे मत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी ब्राह्मण मंडळ रोहा तर्फे आयोजित व्याख्यानात बोलतांना व्यक्त केले.

ब्राह्मण मंडळ रोहाचे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू असून त्यानिमित्ताने विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय उपक्रमांचे आयोजन करण्याचा मंडळाचा मानस आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या रौप्यमहोत्सवी वर्षातील दुसरे पुष्प म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांचे व्याख्यान रोह्याच्या भट सभागृहात आयोजित करण्यात आले होते. रोहेकरांनी या व्याख्यानाला उदंड प्रतिसाद दिला.

(हेही वाचा Veer Savarkar Jayanti 2023 : …म्हणून नेहरूंनी सावरकरांवर गांधी हत्येचा खोटा आरोप केला – रणजित सावरकर)

आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून रणजित सावरकर यांनी ‘हिंदुत्वाची १०० वर्षे’ या विषयावर आपले मतप्रदर्शन करतांना चालू घडामोडींवरही कटाक्ष टाकला. यावेळी व्यासपीठावर ब्राह्मण मंडळ रोहाचे अध्यक्ष अमित आठवले व रौप्यमहोत्सव समितीचे समन्वयक किशोर सोमण उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्राह्मण मंडळ रोहा रौप्यमहोत्सवी समितीचे समन्वयक किशोर सोमण यांनी केले तर रौप्य महोत्सव समिती सदस्य प्रतिक पाटणकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ब्राह्मण मंडळ रोहा सचिव निखिल दाते यांनी केले तर पल्लवी दाते यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता श्वेता आठवले व उपस्थितांनी वंदे मातरम् ने केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण मंडळ रोहाचे सर्व सदस्य व रौप्यमहोत्सव समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.