Veer Savarkar Jayanti 2023 : …म्हणून नेहरूंनी सावरकरांवर गांधी हत्येचा खोटा आरोप केला – रणजित सावरकर

132

१९४८ पासून आतापर्यंत जेव्हा जेव्हा कॉंग्रेस संकटात आली, तेव्हा तेव्हा त्यांनी सावरकरांवर आरोपसत्र सुरू केले. फाळणीच्या विरोधात जेव्हा जनतेत क्षोभ निर्माण झाला होता, तेव्हा नेहरूंनी सावरकरांवर गांधी हत्येचा खोटा आरोप केला, असा गौप्यस्फोट वीर सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी रविवारी केला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४०व्या जयंतीनिमित्त ‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’ची सांगता करताना सावरकर सदन ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकापर्यंत भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत रणजित सावरकर सहभागी झाले. यावेळी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ व्यक्ती नाहीत, विचार आहेत. इतकी वर्षे त्यांची उपेक्षा, नाहक बदनामी करण्यात आली. २०१४ नंतर कॉंग्रेस सत्तेतून गेल्यापासून राहुल गांधी सावरकरांवर वेड्यासारखे आरोप करीत आहेत. पण जनतेला सत्य कळले आहे. त्यामुळेच सावरकरांच्या सन्मानार्थ इतक्या मोठ्या संख्येने जनसमुदाय इथे दाखल झाला आहे.

(हेही वाचा Veer Savarkar : वीर सावरकर यांच्या नावाने राज्य सरकार पुरस्कार देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा)

सावरकरांनी संसद, लोकसभा, राज्यसभा, विधिमंडळ, राष्ट्रपती अशाप्रकारचे अनेक संसदीय शब्द दिले. शिवाय संसद कशाप्रकारे चालावी याचे मार्गदर्शनही केले. देशातल्या प्रत्येक संसद सदस्यांनी आपली जात-पात-धर्म-पंथ-लिंग-भाषा हे सगळे भेद बाजूला सारून संसदेत एक भारतीय नागरिक म्हणून प्रवेश करावा, ही त्यांची सुरुवातीपासूनची संकल्पना होती. त्यामुळे वीर सावरकरांच्या जन्मदिवशी नव्या संसदेचे उद्घाटन व्हावे, हा त्यांचा गौरव आहे. संसदेत झालेल्या धार्मिक विधींबाबत काहीजण आक्षेप घेत आहेत. परंतु, आज जिथे ८० टक्के हिंदू आहेत, तिथे बहुसंख्येच्या संस्कृतीनुसार संसद भवनाचे उद्घाटन झाले नाही, तर तो लोकशाहीचा अपमान ठरेल, असेही रणजित सावरकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.