Navneet Rana: कॉंग्रेसमुळे सामान्य जनता विकासापासून वंचित, नवनीत राणा यांची टीका

98
Navneet Rana: कॉंग्रेसमुळे सामान्य जनता विकासापासून वंचित, नवनीत राणा यांची टीका

कॉंग्रेसने गेल्या ७५ वर्षांच्या काळात सामान्य जनतेला विकासापासून वंचित ठेवले आहे, अशी टीका भाजपा नेत्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. लोकसभेच्या जालना मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ रोड शोच्या समारोपाप्रसंगी त्या बोलत होत्या. (Navneet Rana)

नवनीत राणा पुढे म्हणाल्या, एमआयएम आणि कॉंग्रेस पक्ष जातीपातीचे राजकारण करत असून, पाकिस्तानचे गुणगान गात आहे. त्यामुळे कॉंग्रेसला मत देणे म्हणजे पाकिस्तानला मत देण्यासारखे आहे. देशातील ३ कोटी महिलांना घरे, शेतकऱ्यांपासून मजूर, कामगार आणि महिलांना विकास योजनेचा मार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून नवा आयाम दिला आहे. त्यामुळे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी तुमचे एक मत द्यावे, असे आवाहन यावेळी राणा यांनी केले आहे.

(हेही वाचा – Badrinath Dham: उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला सुरुवात; गेल्या ८ वर्षांत किती भक्तांनी घेतलं दर्शन ? )

यावेळी उमेदवार रावसाहेब दानवे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी, विधानसभाप्रमुख डॉ. सुनील शिंदे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण औटे उपस्थित होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.