Muslim : बेकायदा बांधकामे हटवताना जमले 2000 मुसलमान; तरीही…

बेकायदेशीर मंदिरे, समाधी आणि दर्गे पाडण्यात आले. मात्र स्थानिक मुस्लिम याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत होते.

111

जुनागढ, गुजरातमधील उपरकोट किल्ल्याभोवतीचा परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी, २६ मे २०२३ रोजी सुरू झालेली अतिक्रमणविरोधी मोहीम २७ मे रोजी सकाळपर्यंत सुरू होती. यादरम्यान अनेक बेकायदेशीर मंदिरे, समाधी आणि दर्गे पाडण्यात आले. मात्र स्थानिक मुस्लिम याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत होते. याच भागात एक बैठक झाली आणि मुस्लिम समाजातील 8 नेते उपरकोटला भेट देऊन पाडण्यात आलेल्या धार्मिक स्थळांची पाहणी करू लागले.

स्थानिक प्रशासनाच्या कारवाईनंतर नरसिंह विद्या मंदिरात मुस्लिम समाजाची बैठक झाली. जुनागड महानगरपालिकेचे नगरसेवक वहाबभाई कुरेशी यांनी बेकायदा बांधकामांवर केलेल्या कारवाईची माहिती सोसायटीतील लोकांना दिली. यानंतर नरसिंह विद्या मंदिराच्या मैदानात मुस्लिम वर्गाची बैठक बोलावण्यात आली. जुनागडचे नगरसेवक अद्रेमान भाई पंजा, आसिफ सांद, वहाब भाई कुरेशी यांच्यासह मोठ्या संख्येने मुसलमान 26 मे रोजी दुपारी 2 वाजता शाळेच्या आवारात पोहोचले. यामध्ये स्थानिक मौलवी, मुफ्ती आणि मौलाना यांचा समावेश होता. त्यावेळी सुमारे 1500-2000 मुसलमानांची संख्या पोहचली.पण गुजरात पोलीस आधीच तयार होते. तगडा पोलीस बंदोबस्त तैनात असताना प्रशासनाने आपली कारवाई सुरूच ठेवली.

(हेही वाचा Veer Savarkar : वीर सावरकरांचा 18 फुटांचा पुतळा पोर्टब्लेअर विमानतळावर; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार अनावरण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.