Ganeshotsav 2023 : मुंबईतील ३७६ मंडळांचे अर्ज नाकारले, यंदा २,७२९ मंडळांच्या मंडपांना परवानगी

मुंबईत सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने आयोजित होणाऱ्या गणेशोत्सवाकरता मंडप उभारण्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक आहे.

25
Ganeshotsav 2023 : मुंबईतील ३७६ मंडळांचे अर्ज नाकारले, यंदा २,७२९ मंडळांच्या मंडपांना परवानगी
Ganeshotsav 2023 : मुंबईतील ३७६ मंडळांचे अर्ज नाकारले, यंदा २,७२९ मंडळांच्या मंडपांना परवानगी

श्री गणरायांचे आगमन मंगळवारी होत असून सार्वजनिक उत्सव मंडळाच्या श्री गणरायांचे आगमनही अनेक मंडपामध्ये झाले आहे. त्यामुळे मंडपात मूर्ती विराजमान झाल्यानंतर सजावटीचा शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरु आहे. मात्र, मंगळवारपर्यंत सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने महापालिकेकडे परवानगीसाठी ३७६७ अर्ज प्राप्त झाले असून त्यातील दुबार आणि नाकारलेले अर्ज वगळता एकूण २ हजार ७२९ अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील दुबार अर्ज वगळता सहायक अभियंता परिरक्षण विभागासह स्थानिक पोलिस व वाहतूक पोलिसांनी ३७६ मंडळांचे अर्ज नाकारण्यात आले.

मुंबईत सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने आयोजित होणाऱ्या गणेशोत्सवाकरता मंडप उभारण्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक आहे. मुंबई महानगरपालिकेकडून यंदाच्या गणेशोत्सोवासाठी श्री गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ‘एक खिडकी’ पद्धतीतून ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई महानगरातील गणेशोत्सव मंडळांसाठी १ ऑगस्ट, २०२३ पासून ही सुविधा सुरू करून देण्यात आली होती. या सुविधेअंतर्गत श्री गणेश मंडळांना पोलीस, वाहतूक पोलीस व मुंबई अग्निशमन दल यांच्याकडे परवानगीसाठी वेगळे अर्ज करण्याची गरज नव्हती तसेच यासाठी कोणतेही शुल्क भरण्याचीही गरज नव्हती.

(हेही वाचा – Recruitment : कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याचा जीआर रद्द करा – अधिकारी महासंघाचा इशारा)

त्यामुळे ही सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर मंगळवारी १८ सप्टेंबर पर्यंत एकूण एकूण २ हजार ७२९ गणेश मंडपांना परवानगी देण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मंडपांच्या परवानगीसाठी मंडळाच्यावतीने एकूण ३ हजार ७६७ अर्ज प्राप्त झाले होते. त्यामुळे दुबार अर्थात डुप्लिकेट ६६५ अर्ज आढळून आले. त्यामुळे हे दुबार अर्ज बाद ठरवण्यात आले तर विभागाच्या सहायक अभियंता (परिरक्षण) विभागाच्यावतीने ३३० अर्ज नाकारण्यात आले आणि वाहतूक पोलिस यांच्या मार्फत २६ अर्ज नाकारण्यात आल्याचे महापालिकेने म्हटले आहे. विशेष म्हणजे स्थानिक पोलिस ठाण्याच्यावतीने ११ अर्ज नाकारले आणि विभागीय सहायक आयुक्तांनी ६ अर्ज नाकारले त्यामुळे अशाप्रकारे एकूण ३७३ मंडळांचे अर्ज नाकारण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.