TISS : महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संवाद कौशल्याचे धडे, पण तेही कॉर्पोरेट कंपन्यांकडून

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सासन्सेस (TISS) या संस्थेव्दारे 'वर्तन बदल संवाद' प्रशिक्षणाचे आता पर्यंत २९ सत्रे घेण्यात आली असून एकूण ७८१ कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

143
TISS : महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संवाद कौशल्याचे धडे, पण तेही कॉर्पोरेट कंपन्यांकडून
TISS : महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संवाद कौशल्याचे धडे, पण तेही कॉर्पोरेट कंपन्यांकडून

वर्षानुवर्षे रुग्णांचा वाढता भार आणि वाढता ताण पाहता, आघाडीच्या आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये सहानुभूतीपूर्ण आणि सर्वसमावेशक वृत्ती सुनिश्चित करण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांची संवाद कौशल्य (सॉफ्ट स्किल्स) विकसित करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची कार्य क्षमता वाढवण्यास व विविध विभागामध्ये सुसंवाद साधण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सासन्सेस (TISS) या संस्थेव्दारे ‘वर्तन बदल संवाद’ प्रशिक्षणाचे आता पर्यंत २९ सत्रे घेण्यात आली असून एकूण ७८१ कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व प्रसूतीगृहांमध्ये जुलै व ऑगस्ट महिन्यात वर्तन बदल व संवाद कौशल्य कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सासन्सेस (TISS) या संस्थेद्वारे सक्षम प्रकल्पांतर्गत हे प्रशिक्षण घेतले जात आहे. समुपदेशन कौशल्य हा प्रशिक्षणाचा प्रमुख गाभा असून टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सासन्सेस (TISS) या संस्थेव्दारे ‘वर्तन बदल संवाद’ प्रशिक्षणाचे आता पर्यंत २९ सत्रे घेण्यात आली आहे. या अंतर्गतएकूण ७८१ कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे.

सार्वजनिक आरोग्य सुविधांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आरोग्य कर्मचारी हे संपर्काचे पहिले ठिकाण आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेशी विश्वास आणि संबंध निर्माण करण्यासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये पहिली छाप अत्यंत महत्त्वाची आहे. मुंबईतील सर्व प्रसूतीगृहांमध्ये नुकताच वर्तन बदल आणि संवाद कौशल्य कार्यशाळा पार पडल्या आहेत. या उपक्रमांचा पुढील टप्पा म्हणून अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची टीम ‘बिल्डिंग व लीडरशिप’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा १६ सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती.

(हेही वाचा – Ganeshotsav 2023 : मुंबईतील ३७६ मंडळांचे अर्ज नाकारले, यंदा २,७२९ मंडळांच्या मंडपांना परवानगी)

कार्यशाळेचे उद्घाटन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांच्याहस्ते पार पडले. सर्व उपकार्यकारी आरोग्य अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी व जिल्हा क्षयरोग अधिकारी अशाप्रकारे ८५ अधिकाऱ्यांनी या कार्यशाळेत भाग घेतला. कॉर्पोरेट क्षेत्रातील २६ वर्षांचा अनुभव असलेले प्रसिद्ध वरिष्ठ कॉर्पोरेट प्रशिक्षक बिपिन मयेकर यांनी या कार्यशाळेची धूरा सांभाळून या कार्यशाळेत विविध प्रकारच्या गटक्रिया (Group Activity) घेण्यात आल्या. त्यातील स्वतःचे आणि आपापल्या विभागाचे SWOT Analysis ही प्रभावी गटक्रिया (Group Activity) करण्यात आली. आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी व नवीन उपक्रम राबविण्यासाठी सर्व संबंधीत विभागाचे अधिकारी यांचा समन्वय असणे गरजेचे आहे. समान लक्ष्य व उद्दीष्टे समजणे, त्यांच्या दैनंदिन कामामध्ये येणाऱ्या समस्या व लोकप्रतिनिधींशी संवाद या सर्व बाबींकरीता लागणारे कौशल्य विकसित करणे या विचाराने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.