झारखंडमधील भरती परीक्षांतील कथित अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन (Jharkhand Student Protest) अधिक तीव्र झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींवर सडकून टीका केली आहे. (Anurag Thakur Slams Rahul Gandhi Over Jharkhand Protest)
#WATCH | Delhi | On BJP slamming Rahul Gandhi for his silence on Jharkhand students’ protest, BJP MP Anurag Thakur says, “Is Congress’ politics opportunist? Do the youth of Jharkhand have no value for Congress? Will Rahul Gandhi go and lie down outside the Jharkhand CM’s… pic.twitter.com/MwsoOtcKx8
— ANI (@ANI) August 6, 2026
प्रसारमाध्यमांशी बोलताना अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “काँग्रेसचं राजकारण संधीसाधू आहे. काँग्रेसच्या दृष्टीने झारखंडच्या तरुणांना काहीच किंमत नाही का? पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर जसे राहुल गांधी आडवे झोपले होते, तसेच ते झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर जाऊन आंदोलन करतील का? राहुल गांधी इतर मुद्द्यांप्रमाणेच झारखंडमधील युवकांसाठीही आंदोलन करणार का?” असे सवाल केले. काँग्रेस केवळ राजकीय फायद्यासाठी तरुणांचा वापर करत असल्याचेही त्यांनी म्हटले. (Anurag Thakur Slams Rahul Gandhi Over Jharkhand Protest)
(हेही वाचा : JPSC Paper Leak: झारखंड लोकसेवा आयोग परीक्षा घोटाळा: आणखी ५ आरोपींना अटक; विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र )
यावेळी त्यांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकारच्या काळात १९ पैकी १७ भरती परीक्षांचे पेपर फुटल्याचा मुद्दाही उपस्थित केला. त्या वेळी राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहिले नव्हते, अशी टीका अनुराग ठाकूर यांनी केली. (Anurag Thakur Slams Rahul Gandhi Over Jharkhand Protest)
हेही पाहा:


