Strait of Hormuz मधून ६० व्यापारी जहाजे भारतात पोहोचली; ३९७२ खलाशी सुरक्षितपणे परतले

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz)  होणाऱ्या सागरी प्रवासाबाबत मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली होती.

93
Aerial view of multiple cargo ships in the Strait of Hormuz.
A fleet of cargo ships navigating the Strait of Hormuz.

मध्य पूर्वेतील अत्यंत महत्त्वाच्या आणि मोक्याच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुज सामुद्रधुनीच्या (Strait of Hormuz) मार्गावरील ६० मोठी भारतीय व्यापारी जहाजे सुरक्षितपणे बाहेर पडली असून, ती भारतापर्यंत पोहोचली आहेत. तसेच ३९७२ खलाशांना सुरक्षितपणे परत आणण्यात आले आहे. संसदेतील एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने सांगितले की, आखाती प्रदेशातून ३,९७२ भारतीय खलाशांना परत आणण्यात आले, तर एका २४ तास कार्यरत असलेल्या संकट व्यवस्थापन प्रणालीने हजारो कॉल्स आणि ईमेल्स हाताळले.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz)  ६० व्यापारी जहाजे बाहेर काढण्यासाठी सरकारने विशेष योजना आखली होती. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी खलाशांना संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले होते. मंत्रालयाने म्हटले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz)  होणाऱ्या सागरी प्रवासाबाबत मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली होती. त्यामुळे भारतीय प्रवशांना धोकादायक कामे करण्याबाबत दबाव नव्हता. संघर्षग्रस्त क्षेत्रांमध्ये, संबंधित खलाशाच्या संमतीने केवळ आपत्कालीन परिस्थितीतच कर्मचारी बदलास परवानगी आहे.

(हेही वाचा Strait of Hormuz : होर्मूध सामुद्रधुनीत इराण – ओमान करार अंतिम टप्प्यात, तेलाचे दर ८० डॉलरच्या खाली)

स्थलांतर आणि मायदेशी परत आणण्याच्या कार्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी, एक समर्पित २४x७ नियंत्रण कक्ष आणि नौवहन महासंचालनालयाचे सागरी क्षेत्र जागरूकता केंद्र अहोरात्र कार्यरत आहेत. नियंत्रण कक्षाने खलाशी, त्यांचे कुटुंबीय आणि सागरी क्षेत्राशी संबंधित इतर लोकांकडून आलेले १५,७७१ फोन कॉल्स आणि ३६,४९९ ईमेल्स हाताळले आहेत. भारतीय खलाशांची नियुक्ती परवानाधारक भरती आणि नियुक्ती सेवा एजन्सी (RPSL) मार्फत केली जाते. प्रमाणित नियामक मंजुरीशिवाय कोणताही खलाशी इमिग्रेशन क्लिअरन्स पूर्ण करू शकत नाही. दरम्यान, होर्मुज सामुद्रधुनी (Strait of Hormuz)   हा जगातील तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहतुकीसाठीचा अत्यंत संवेदनशील आणि प्रमुख मार्ग आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.