महाराष्ट्राची संस्कृती अन् भावनिक दुवा, १ लाख अमराठी चालकांनी शिकली मराठी भाषा; मंत्री Pratap Sarnaik यांची माहिती

78
बैठकीत सहभागी व्यक्तींचा समूह, मराठी शिकवणी अभियानाबद्दल चर्चा
महाराष्ट्राची संस्कृती अन् भावनिक दुवा, १ लाख अमराठी चालकांनी शिकली मराठी भाषा; मंत्री Pratap Sarnaik यांची माहिती
  • प्रतिनिधी

Pratap Sarnaik             राज्यातील अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांमध्ये मराठी भाषेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचा दावा परिवहन विभागाने केला आहे. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला’ मिळालेल्या प्रतिसादाचा आढावा घेताना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी ही केवळ भाषा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडणारा भावनिक दुवा असल्याचे सांगितले. (Pratap Sarnaik)

मराठी भाषा विभाग, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानाला राज्यभर चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले. मराठी शिकण्याचा निर्णय घेणारा प्रत्येक चालक हा केवळ नियमांचे पालन करणारा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आदर करणारा नागरिक ठरत असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले. (Pratap Sarnaik)

(हेही वाचा – Strait of Hormuz : होर्मूध सामुद्रधुनीत इराण – ओमान करार अंतिम टप्प्यात, तेलाचे दर ८० डॉलरच्या खाली)

बैठकीदरम्यान मराठी शिकण्यामुळे प्रवासी आणि चालक यांच्यातील संवाद अधिक सुलभ होत असल्याचे निरीक्षण व्यक्त करण्यात आले. व्यवहारिक मराठीचा वापर वाढल्यास परस्परांतील विश्वास आणि आत्मीयता अधिक दृढ होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. (Pratap Sarnaik)

१ मेपासून सुरू झालेल्या या अभियानाचा समारोप १७ ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार आहे. मुख्यमंत्री यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या हजारो चालकांना व्यवहारिक मराठीचे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली. (Pratap Sarnaik)

(हेही वाचा – Neeraj Chopra : राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्ण हुकल्यानंतर नीरज चोप्राने सांगितला गेल्या १० महिन्यांतील संघर्ष आणि दुखापतींशी झटापट)

दरम्यान, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, या अभियानाअंतर्गत राज्यभरातील १ लाखांहून अधिक अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. उर्वरित चालकांनीही १५ ऑगस्टपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करून मराठीशी नाळ जोडावी, असे आवाहन त्यांनी केले. “महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल तर मराठीशी संवाद आवश्यक आहे. ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी दोन प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो,” असे सांगत त्यांनी मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल, असा विश्वास व्यक्त केला. (Pratap Sarnaik)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.