स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समिती संचलित महाराष्ट्र मिलिटरी स्कूल, तळवली येथे ५ ऑगस्ट २०२६ ला ‘लायन्स इंटरनॅशनल लायन्स क्लब ऑफ मुंबई समृद्धी’ यांच्याकडून मोफत नेत्र तपासणी शिबिर (Eye Check-up Camp) आणि चष्मा वाटप कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमासोबतच विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या बौद्धिक विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. (Eye Check-up Camp)

या कार्यक्रमाचे आयोजन सुहास नार्वेकर यांनी केले होते. कार्यक्रमाला संस्थेचे कार्यवाह रणजीत सावरकर यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विकास सराफ व त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

नेत्र तपासणी शिबिरादरम्यान (Eye Check-up Camp) शाळेतील तब्बल २८२ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४८ विद्यार्थ्यांमध्ये दृष्टीदोष आढळून आले. यातील गरजू १९ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. उर्वरित विद्यार्थ्यांना आवश्यक ते वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले.

(हेही वाचा MSRTC : ‘रिल्स’ बनवणं आता महागात पडणार! एसटी कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाची नवी नियमावली जाहीर)
केवळ आरोग्य तपासणीवर न थांबता, लायन्स क्लब इंटरनॅशनलतर्फे शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी दोन लॅपटॉप भेट (डोनेशन) म्हणून देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या संगणकीय शिक्षणाला गती मिळण्यास मदत होणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आणखी वाढावी म्हणून ‘वैदिक मॅथ्स’ (Vedic Maths) आणि ‘आयक्यू टेस्ट’ (IQ Test) या विषयांवर मार्गदर्शन व विशेष उपक्रम आयोजित करण्यात आले. (Eye Check-up Camp)

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे कार्यवाह रणजीत सावरकर यांनी लायन्स इंटरनॅशनल लायन्स क्लब ऑफ मुंबई समृद्धीच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल व सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले. आरोग्य आणि शिक्षणाचा सुंदर मेळ घालणारा हा उपक्रम (Eye Check-up Camp) विद्यार्थी व पालकांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरला.
Join Our WhatsApp Community

