Ahilyadevi Holkar Karj Mafi Yojana 2026 : कर्जमाफीसाठी सरकार ‘मिशन मोड’वर! अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; लवकरच खात्यात पैसे जमा होणार?

144
कृषक आणि बैलांद्वारे शेतात काम करताना
Ahilyadevi Holkar Karj Mafi Yojana 2026 : कर्जमाफीसाठी सरकार 'मिशन मोड'वर! अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; लवकरच खात्यात पैसे जमा होणार?
  • प्रतिनिधी

Ahilyadevi Holkar Karj Mafi Yojana 2026              राज्यातील लाखो बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. बहुप्रतीक्षित ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना- २०२६’ च्या अंमलबजावणीसाठी आता राज्य सरकारने थेट ‘मिशन मोड’वर काम सुरू केले आहे. कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा व्हावेत यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रचंड हालचाली सुरू झाल्या असून, सहकार विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आगामी काळातील सर्व प्रकारच्या रजा आणि सुट्या तडकाफडकी रद्द करण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे, तर जे कर्मचारी आधीच रजेवर गेले आहेत, त्यांना तात्काळ कामावर हजर होण्याचे कडक आदेश आज जारी करण्यात आले आहेत. (Ahilyadevi Holkar Karj Mafi Yojana 2026)

(हेही वाचा – IMD storm alert 17 states: पुढील १५ तासांत ‘या’ १७ राज्यांमध्ये मेघगर्जना आणि पावसाचा इशारा; IMD अपडेट)

​राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे, मात्र आता या प्रक्रियेला कमालीचा वेग आला आहे. कर्जमाफीच्या अंतिम टप्प्यासाठी शासनाला कोणत्याही क्षणी अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील माहिती लागू शकते. अशा परिस्थितीत संपूर्ण यंत्रणा सज्ज असणे आवश्यक असल्याने जिल्हा उपनिबंधक, तालुका सहायक निबंधक आणि वर्ग-२ च्या सर्व अधिकाऱ्यांना आपापल्या मुख्यालयातच चोवीस तास उपस्थित राहण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या एका आपत्कालीन व्हीसी (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) बैठकीत हे आदेश थेट बजावण्यात आले असून, संपूर्ण यंत्रणेला युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Ahilyadevi Holkar Karj Mafi Yojana 2026)

(हेही वाचा – डॉक्टर बापाचा ‘काळा’ कारनामा! नीट पेपरफुटीत पालकाला पहिल्यांदाच अटक; कोण आहे Dr Manoj Shirure?)

​या योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांचे तब्बल दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ केले जाणार आहे. या ऐतिहासिक कर्जमाफीचा लाभ ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीककर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्व सहकारी बँकांसह राष्ट्रीयीकृत बँकांकडून घेतलेल्या कर्जांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. प्रशासनाची ही गुप्त आणि वेगवान तयारी पाहता, पुढील काही दिवसांतच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. (Ahilyadevi Holkar Karj Mafi Yojana 2026)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.