Agri koli Bhavan : दहिसरमध्ये उभारणार आगरी कोळी भवन

मुंबईत आगरी-कोळी भवन बांधण्याची मागणी होत असतानाच आता दहिसरमध्ये अशाप्रकारचे भवन उभारले जाणार आहे.

198
Agri koli Bhavan : दहिसरमध्ये उभारणार आगरी कोळी भवन
Agri koli Bhavan : दहिसरमध्ये उभारणार आगरी कोळी भवन

मुंबईत आगरी-कोळी भवन (Agri Koli Bhavan) बांधण्याची मागणी होत असतानाच आता दहिसरमध्ये अशाप्रकारचे भवन उभारले जाणार आहे. यासाठीचे आरक्षण बदलाची प्रक्रिया पूर्ण झाली असून दहिसरमध्ये बहुउद्देशीय समाज कल्याण केंद्राचे आरक्षण उपलब्ध करून घेण्यात आले असून त्यामध्ये हे आगरी कोळी भवन उभारण्यात येणार आहे, असल्याची माहिती मिळत आहे. (Agri koli Bhavan)

महापालिकेच्या आर/उत्तर विभागाच्या मंजूर विकास आराखडा २०३४ नुसार दहिसर येथील सुधारित न. भू. क्र. ३१९क (जुना न. भू. क्र. ३५७ (भाग)) हा भूखंड मनोरंजन मैदान (EOS26) या उदिष्टाकरिता आरक्षित होता. परंतु स्थानिक लोक प्रतिनिधी यांनी दहिसर (Dahisar) विभागातील आगरी-कोळी भवन (Agri koli Bhavan) बांधण्याकरता सामाजिक भवन आस्तित्वात नसल्यामुळे भूखंडावर आगरी-कोळी भवन (Agri koli Bhavan) बांधण्याची मागणी केली होती. (Agri koli Bhavan)

मनोरंजन मैदान आणि खेळाचे मैदान आरक्षण

या मंजूर पुनर्रचित विकास आराखडा, १९९१ नुसार दहिसर येथील न. भू. क्र. ३१९फ हा मनोरंजन मैदान व स्मशानभूमी करिता राखीव होता व ३६.६० मी. रुंद विकास नियोजन रस्त्याने बाधित होता. परंतु २० ३४च्या मंजूर विकास आराखड्यानुसार दहिसर येथील न. भू. क्र. ३१९फ (भाग) हा अस्तित्वातील मनोरंजन मैदानाचा भाग हा मोठ्या आरक्षणाने बाधित आहे. व या भूभागावर खेळाचे मैदान असे आरक्षण आहे. तसेच हा भूभाग सध्याच्या अस्तित्वातील रस्त्याने व ९.१० मी रुंद रस्ता रेषेने बाधित आहे. हा भूभाग हा रहिवाशी क्षेत्रात मोडत असून हा किनारपट्टी क्षेत्रनियम नुसार सी. आर. झेड.-॥ ने बाधित आहे असल्याची माहिती विकास नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Agri koli Bhavan)

(हेही वाचा – Shani Shingnapur : शनिशिंगणापूर देवस्थानाला भ्रष्टाचाराचा विळखा; अतिरिक्त कर्मचारी नियुक्ती; निविदेशिवाय खरेदी )

टी. डी. आर. (T. D. R.) च्या बदल्यात हा भूभाग महापालिकेला हस्तांतरित

दहिसर येथील न. भू. क्र. ३१९ फ हा भूभाग मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात असून त्याचे एकूण क्षेत्रफळ हे ४९७५.६० चौरस मीटर एवढे आहे. तसेच मालमत्ता पत्रकावर महापालिकेचे नाव आहे. त्यामुळे हस्तांतरणीय विकास हक्क (T. D. R.) च्या बदल्यात हा भूभाग ०४ मार्च २०११ रोजी महापालिकेला हस्तांतरित करण्यात आला आहे. या भूभागाच्या पश्चिम व उत्तर बाजूस अस्तित्वातील रस्ता आहे. त्यामुळे येथील मनोरंजन मैदानाच्या भूखंडावर आगरी-कोळी भवन (Agri koli Bhavan) बांधण्याकरिता ‘बहुउद्देशीय समाज केंद्र’ (Multi Purpose Social Welfare Centre) असे आरक्षण टाकण्याची प्रक्रिया आता पूर्ण झाली असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे लवकरच या बहुउद्देशीय समाज कल्याण केंद्राच्या जागेवर आगरी-कोळी भवन (Agri koli Bhavan) उभारले जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दहिसरमध्ये मोठ्या संख्येने आगरी-कोळी समाजातील लोक राहत असून त्यांच्यासाठी हे भवन आता महत्वाचे ठरणार आहे. (Agri koli Bhavan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.