Deepak Kesarkar : प्रत्येक दलित वस्ती जवळ उभारणार ग्रंथालय आणि रिडिंग रूम

घनकचरा वर्गीकरण आणि स्वच्छता अभियान राबवण्यासह मुंबई शहरातील विविध वस्ती व घरगल्ली स्वच्छता उपक्रम राबवला जावा अशा सूचना शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.

96
Deepak Kesarkar : प्रत्येक दलित वस्ती जवळ उभारणार ग्रंथालय आणि रिडिंग रूम
Deepak Kesarkar : प्रत्येक दलित वस्ती जवळ उभारणार ग्रंथालय आणि रिडिंग रूम

घनकचरा वर्गीकरण आणि स्वच्छता अभियान राबवण्यासह मुंबई शहरातील विविध वस्ती व घरगल्ली स्वच्छता उपक्रम राबवला जावा अशा सूचना शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. झोपडपट्टी वसाहतीत शौचालयांची पुनर्बांधणीच्या कामाला गती द्या तसेच बायोटॉयलेट जास्तीत जास्त उभारण्यात यावेत अशाही सूचना त्यांनी करताना प्रत्येक दलित वस्तीजवळ कंटेनरचा वापर करून ग्रंथालय आणि रिडींग रूम उभारले जावेत अशाही सूचना केल्या. (Deepak Kesarkar)

राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महानगरपालिका मुख्यालयात मुंबईतील विविध कामांबाबत बुधवारी १ नोव्हेंबर २०२३ रोजी आढावा बैठक घेतली. या बैठकीस आमदार सदा सरवणकर, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव, शीतल म्हात्रे, तृष्णा विश्वासराव, सुनील मोरे आदी माजी नगरसेवकांसह विविध परिमंडळांचे सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त यांच्यासह संबंधित अधिकारी आदी उपस्थित होते. (Deepak Kesarkar)

या बैठकीमध्ये पालकमंत्री केसरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरामध्ये प्रोजेक्शन मॅपिंग, विद्युत रोशणाई व सुशोभीकरण करणे; जगन्नाथ शेठ, भागोजी शेठ कीर यांचे स्मारक उभारणे; वरळी येथील समुद्र किनाऱ्यावर सांडपाणी वाहिनीद्वारे पाणी समुद्रात सोडणे; सिद्धिविनायक मंदीर, बाबुलनाथ मंदिर, पारशी आग्यारी, माहीम चर्च इत्यादी धार्मिक स्थळ परिसरांचा विकास करण्याच्या कामाबाबतही सूचना केल्या. किनारी रस्ता प्रकल्पाच्या भराव केलेल्या जागी उद्यान विकसित करणे, मफतलाल येथील भूखंडाखाली भूमिगत मत्स्यालय बांधण्याबाबत संभाव्यता तपासणे; दादर-नायगाव परिसरातील ‘पुरंदर स्टेडियम’ विकसित करणे; विद्यालंकार महाविद्यालयाशेजारील जागा मुस्लिम कब्रस्तानसाठी वाढवून मिळणे इत्यादी कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. (Deepak Kesarkar)

(हेही वाचा – Maratha Reservation : पश्चिम महाराष्ट्रातही सापडले कुणबी दाखले; काय आहे मागणी ?)

दारूखाना-बीपीटी-बीएमसीकडून संयुक्त उपक्रम राबविणे; हँगिंग गार्डन शेजारील पाण्याची टाकी, महात्मा जोतिबा फुले मंडई परिसरात हातगाडीने होणाऱ्या मालवाहतुकीचे आधुनिकीकरण करणे, मुंबईतील भाजी मंडई, मटण मार्केट, चिकन मार्केट दुरुस्तीबाबत कार्यवाही करणे; पुनर्विकास अंतर्गत विविध प्रकल्प आदी कामांचा आढावा घेतला. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हतेनुसार कार्यकारी सहायक पदावर पदोन्नती देणे; महानगरपालिकेतील सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी यांच्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेतील सेवा जोडून उचित लाभ देणे; महानगरपालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे आदी कामांचा आढावा घेत सूचना केल्या. (Deepak Kesarkar)

मालमत्ता स्थलांतर प्रकरणे निकाली काढणे; महानगरपालिकेतील स्वच्छता कामगार नेमणे, प्रमुख रुग्णालयांमध्ये डायलिसिस केंद्र सुरू करणे; दिव्यांग नागरिकांना महानगरपालिका आणि बेस्टकडून विविध सुविधा पुरविणे; मुंबईतील रस्त्यांचे सिमेंट क्रॉंकिटीकरण आढावा; मुंबईतील प्रदूषण आणि त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना; मुंबई शहरातील उड्डाणपूल; प्रगतिपथावरील सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश दीपक केसरकर यांनी प्रशासनाला दिले. मुंबईतील नागरिकांच्या समस्यांचे शासन आणि प्रशासन यंत्रणेने स्वतःहून निराकरण केल्यास शासन आणि प्रशासनाला नागरी समस्यांची जाणीव आहे, ही सकारात्मक भावना नागरिकांमध्ये विकसित होईल, अशी भावना त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली. (Deepak Kesarkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.