Maratha Reservation : पश्चिम महाराष्ट्रातही सापडले कुणबी दाखले; काय आहे मागणी ?

90
Maratha Reservation : पश्चिम महाराष्ट्रातही सापडले कुणबी दाखले; काय आहे मागणी ?
Maratha Reservation : पश्चिम महाराष्ट्रातही सापडले कुणबी दाखले; काय आहे मागणी ?

मनोज जरांगे पाटील यांनी ‘मराठवाड्यातील सापडलेल्या कुणबी दाखल्यांच्या पुराव्याच्या आधारे राज्यातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले द्या’, अशी मागणी केली आहे. (Maratha Reservation) त्यांच्या दाव्याला पुष्टी मिळवणारी माहिती समोर येत आहे. आता पश्चिम महाराष्ट्रात देखील मोठ्या संख्येने कुणबी दाखले सापडू लागले आहेत. जुने रेकॉर्ड तपासताना सोलापुरातील भोसे या गावात आता कुणबी दाखल्यांची नोद असल्याचे समोर आले आहे. (Maratha Reservation)

सोलापुरातील काही राजकारण्यांनी या आधीच कुणबी दाखले काढून घेतल्याचेही यामध्ये दिसून आले. आता मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर जुने रेकॉर्ड तपासतांना भोसेसारख्या लहानशा गावात 25 पेक्षा जास्त दाखले सापडले आहेत. सध्या ज्यांच्याकडे मराठा अशी नोंद आहे, त्यांच्या पूर्वजांची नोंद ही मराठा कुणबी असल्याचे या दाखल्यांमधून स्पष्ट झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावातील शाळेत 1885 पासूनचे रेकॉर्ड सापडले आहे. यातील 1800 ते 1900 या काळातील दाखले मोडी लिपीत, तर त्यानंतरचे दाखले मराठीमध्ये सापडले. अनेकांच्या पूर्वजांचे दाखले कुणबी म्हणून सापडल्याने आता प्रशासनाने पश्चिम महाराष्ट्रात देखील जुनी कागदपत्रे तपासणीची मोहीम तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. (Maratha Reservation)

(हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नाही; जरांगे यांचा एल्गार)

अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाही आणि वाटू देणार नाहीत. सरकारने विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा करावी. शिंदे समितीचा प्रथम अहवाल तयार करून त्याला राज्याचा दर्जा देऊन सरसरट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावीत, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. ठोस निर्णय घेतला नाही, तर पाणी बंद करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी  दिला आहे. (Maratha Reservation)

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत, यावर १ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत एकमत झाले. (Maratha Reservation) मागच्या वेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना जे आरक्षण दिले होते, ते उच्च न्यायालयात टिकले होते. सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले होते. त्यातील त्रुटी दूर करण्याचे काम चालू आहे.मनोज जरांगे पाटील यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी सरकारला सहकार्य करावे. मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे की, सरकारच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा. सकल मराठा समाजाने शांतता प्रस्थापित करून राज्यसरकारला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. (Maratha Reservation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.