-
ऋजुता लुकतुके
केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन केला आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार आणि निवृत्तीवेतन यामुळे वाढणारा खर्च लक्षात घेऊन भारतीय रेल्वेनं देखभाल, सामुग्री विकत घेणं यासाठीच्या खर्चात कपात सुरू केल्याचं समोर आलं आहे. आठवा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांना दिलं जाणारं वेतन अभ्यासणार आहे आणि त्यातील महागाई भत्ता व इतर भत्त्यातील सुधारणा सुचवणार आहे. ही प्रक्रिया २०२६ मध्ये पूर्ण होईल. पण, त्यानंतर पूर्वलक्षी प्रभावाने ही वेतन वाढ लागू होईल. त्यादृष्टीने रेल्वेनं आतापासूनच खर्च कमी करण्याचं ठरवलं आहे. (8th Pay Commission)
वेतन आयोगाच्या शिफारसी १ जानेवारी २०२६ पासून लागू होतील, अशीही चर्चा आहे. ५० लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि ६९ लाख निवृत्तीवेतनधारक यांना या शिफारसींचे लाभ मिळतील. भारतीय रेल्वे ही सरकारी कंपन्यांमधील सगळ्यात नफ्यात असलेली संस्था आहे. २०२४-२५ मध्ये रेल्वेचा महसूल १,३४१ कोटी रुपये इतका होता. २०२५-२६ मध्ये तो वाढून ३,०४० कोटी रुपयांवर जाईल असा अंदाज आहे. पण, त्याचवेळी वेतनावरील खर्च वाढणार असल्यामुळे भारतीय रेल्वेनं आधीपासून काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. (8th Pay Commission)
(हेही वाचा – ऑस्ट्रेलियातील Bondi Beach वरील दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंध; पोलीस आयुक्तांनी दिली माहिती)
‘रेल्वे भाड्यामधून मिळणारं उत्पन्न येणाऱ्या काळात वाढेल. ते १५,००० कोटी रुपयांपर्यंत जाईल असा रेल्वेचा अंदाज आहे. त्यामुळे रेल्वेला तातडीने कर्ज घेण्याची गरज नाही. पण, वाढील वेतनाची तरतूद करण्याच्या दृष्टीने देखभालीचा खर्च, सामुग्री खरेदी व वीज खर्च यात कपात करण्याचा रेल्वे विचार करत आहे,’ असं रेल्वेतील एका वरिष्ठ पदावरील व्यक्तीने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं आहे. त्यांनी त्या आशयाची बातमीही केली आहे. वेतन रचनेतील महागाई भत्ता हा एक महत्त्वाचा घटक आहे. (8th Pay Commission)
माणसाचे दैनंदिन खर्च वाढतात, जीवनमानाचा खर्च वाढतो, त्या प्रमाणात त्याला पगार वाढ देण्याची ही सोय आहे. सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतनात दैनंदिन खर्च किंवा जीवनमानावर होणारा खर्च असा एक घटक असतो आणि देशाच्या महागाई दराशी तो निगडित असतो. मूलभूत सेवांचे खर्च वाढतात, तशी या भत्त्यातही सुधारणा करण्यात येते. साधारणपणे सरकारी कर्मचाऱ्याचा पगार हा मूळ वेतन, महागाई भत्ता, धरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, इतर भत्ते आणि निवृत्ती निधी यांचा बनलेला असतो. (8th Pay Commission)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

