Gokhale Bridge : गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाआड येणारी २८ बांधकामे हटवली

239
Gokhale Bridge : गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाआड येणारी २८ बांधकामे हटवली
Gokhale Bridge : गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाआड येणारी २८ बांधकामे हटवली

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या (Gokhale Bridge) बांधकामात अडथळा ठरणारी रहिवासी आणि व्यावसायिक स्वरूपाची २८ बांधकामे महापालिकेच्या के पूर्व विभागाच्यावतीने जमिनदोस्त करण्यात आली आहेत. सध्या महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत याठिकाणी विविध टप्प्यात काम सुरू आहे. त्यात कामांपैकी एका कामामध्ये क्रेन उभारणीसाठी काही बांधकामे हटवण्याची गरज निर्माण झाली होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे या पुलाच्या बांधकामाला आता गती प्राप्त होणार आहे.

(हेही वाचा – Cyber Security : राज्यातील नागरिकांना आता सायबर सुरक्षा कवच; २४ तास कॉल सेंटर कार्यरत राहणार)

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या महत्वाच्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम वेगाने व्हावे, यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. या पुलाची किमान एक मार्गिका सुरू करण्यासाठी महानगरपालिकेच्या पूल विभागाची यंत्रणा याठिकाणी दिवसरात्र काम करत आहे. गर्डरच्या कामासाठी विभागाच्या माध्यमातून बांधकाम निष्कासन कारवाई सूचना के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त मनिष वळंजू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. (Gokhale Bridge)

Gokhale Bridge : गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाआड येणारी २८ बांधकामे हटवली
Gokhale Bridge : गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाआड येणारी २८ बांधकामे हटवली

गोखले पुलासाठी लागणाऱ्या गर्डरचे सुटे भाग हे ऑगस्ट महिन्यात अंबाला येथून मुंबईत दाखल झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील गर्डरचे सर्व सुटे भाग अंधेरी येथे दाखल झाले आहेत. पुलाच्या कामाअंतर्गत रेल्वेच्या भागात टाकण्यात येणाऱ्या गर्डरसाठी क्रेनचा वापर करण्यात येणार आहे.

या क्रेनच्या कामासाठी २८ निवासी आणि वाणिज्यिक बांधकामे अडथळा ठरत होती. त्यापैकी १३ रहिवासी बांधकामे ही पाडण्यात आली, तर १५ व्यावसायिक बांधकामे हटवण्यात आली आहेत. या कार्यवाहीमध्ये ४ अभियंते आणि १५ कर्मचारी यांच्या मदतीने ही बांधकामे हटवण्यात आली. तसेच एक जेसीबीचा वापर देखील करण्यात आला. (Gokhale Bridge)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.