Ganesh Festival In Mumbai : मुंबईत यंदाचा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने ठरणार निर्बंधमुक्त

159
Ganesh Festival In Mumbai : मुंबईत यंदाचा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने ठरणार निर्बंधमुक्त
Ganesh Festival In Mumbai : मुंबईत यंदाचा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने ठरणार निर्बंधमुक्त

मुंबईतील यंदा गणेशोत्सव (Ganesh Festival In Mumbai) आता खऱ्या अर्थाने निर्बंधमुक्त साजरा करता येणार असून मागील वर्षी केवळ कोविडचे निर्बंध हटवण्यात आले होते तर यंदा गणेश मूर्तींवरही निर्बंध नाहीत. त्यामुळे यंदा कोविड पूर्वी ज्याप्रमाणे गणेशोत्सव साजरा केला जात होता, त्याचप्रमाणे आता उत्सव साजरा होणार असल्याने मुंबईकरांना पुन्हा एकदा उंच गणेशमूर्तींचे दर्शन तसेच आकर्षक सजावटही पाहता येणार आहे.

(हेही वाचा – Road Safety Measures : रस्ते सुरक्षा उपाययोजनांसाठी विभागीय पातळीवर अभियंत्यांना प्रशिक्षण)

मार्च २०२०मध्ये कोविड साथ रोगाची लाट आल्यानंतर २०२० आणि २०२१मधील गणेशोत्सव हे अत्यंत निर्बंधामध्ये साजरे करावे लागले होते, परंतु २०२२मध्ये कोविडची लाट कमी झाल्याने कोविडचे निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी सार्वजनिक गणेश मूर्तींच्या उंचीवरील निर्बंध कायम होते; परंतु यंदा गणेश मूर्तींवरील उंचीचेही निर्बंध हटवण्यात आल्याने यंदाचा गणेशोत्सव हा खऱ्या अर्थाने निर्बंधमुक्त होणार आहे. कोविडच्या पहिल्या 2 वर्षी उत्सव मनाप्रमाणे साजरा करता न आल्याने मागील वर्षी काही प्रमाणात भाविकांनी दीड दिवसांऐवजी 5 ते 7 तसेच अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पांचा मुक्काम लांबवत त्यांची मनोभावे पुजा केली होती. परंतु यंदा २०२० पूर्वी ज्याप्रकारे मूर्तीची उंची आणि मंडपातील भाविकांची गर्दी आदींवर कोणताही निर्बंध नव्हता, त्याप्रमाणे हा उत्सव साजरा करता येणार असल्याने सर्व भाविकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. (Ganesh Festival In Mumbai)

महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यंदा गणेशमूर्ती, तसेच मंडपातील गर्दी यावर सध्या तरी कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्याने २०२० पूर्वी ज्याप्रकारे गणेशोत्सव साजरा केला जात होता, त्याप्रमाणेच हे साजरे केले जात आहे. मूर्तीच्या उंचीवरीही कोणतेही निर्बंध नसल्याने अनेक उत्सव मंडळाच्या गणेश मूर्ती या आपल्या दरवर्षीच्या प्रमाणेच उंच बनवल्या जात आहे. अनेक गणेश मूर्ती बनवणाऱ्या कार्यशाळांमध्ये उंच गणेश मूर्ती बनवण्याचे काम सुरु आहे.

कोविड काळात जे काही सोसले त्यामुळे उत्सवातील आनंदच निघून गेला होता. त्यामुळे गणेशोत्सव मंडळ आणि भाविकांच्या इच्छेनुसार या उत्सवावरील निर्बंध हटवण्यासाठी बृहन्मुंबई गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री तथा सरकारने यंदा पीओपीच्या गणेशमूर्तींच्या अटीत शिथिलता, उंचीवरील निर्बंध मागे घेतल्याने कोविडच्या लाटेनंतर आता खऱ्या अर्थाने निर्बंधमुक्त असा हा सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार आम्ही व्यक्त करत असल्याचे सांगत समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड नरेश दहिबावकर यांनी आता खऱ्या अर्थाने २०१९प्रमाणे मोकळेपणाने सण साजरा करत आनंदाचा क्षण अनुभवता येईल, असे स्पष्ट केले. (Ganesh Festival In Mumbai)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.