Road Safety Measures : रस्ते सुरक्षा उपाययोजनांसाठी विभागीय पातळीवर अभियंत्यांना प्रशिक्षण

493
Road Safety Measures : रस्ते सुरक्षा उपाययोजनांसाठी विभागीय पातळीवर अभियंत्यांना प्रशिक्षण
Road Safety Measures : रस्ते सुरक्षा उपाययोजनांसाठी विभागीय पातळीवर अभियंत्यांना प्रशिक्षण

मुंबईतील रस्त्यांचा गुणवत्तापूर्ण विकास करतानाच नागरिकांसाठी रस्त्यांवरील सुरक्षा वाढवणे आणि नागरिकांचे राहणीमान उंचावण्याच्या उद्देशाने अभियंत्यांची नुकतीच एक कार्यशाळा पार पडली. (Road Safety Measures) मुंबई महानगरपालिकेच्या विभाग पातळीवर कार्यरत अभियंत्यांसाठीही मोठ्या पातळीवर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या नागरी प्रशिक्षण व संशोधन केंद्रात विविध टप्प्यांमध्ये हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कार्यकारी, सहाय्यक, दुय्यम आणि कनिष्ठ अभियंत्यांना अशा सर्व संवर्गातील या कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले. मुंबईतील रस्ते सुरक्षितता, रस्त्यांचे आराखडे, प्रक्रिया, रस्त्यांसाठी चिन्हांचा आणि दिशादर्शकांचा वापर यासारख्या विषयांचा कार्यशाळेत समावेश होता.

(हेही वाचा – Malini Rajurkar : सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन)

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार आणि अतिरिक्त‍ आयुक्त पी. वेलरासू यांच्या सूचनेनुसार महानगरपालिका, ब्लूमबर्ग फिलांथ्रोपिज इनिशिएटीव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी (बीआयजीआरएस) वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट, ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिटिव्ह (जीडीसीआय) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. महानगरपालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागाच्या निवडक ३३ अभियंत्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. कार्यकारी, सहाय्यक, दुय्यम आणि कनिष्ठ अभियंत्यांना अशा सर्व संवर्गातील या कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले. महानगरपालिकेसोबत कार्यरत असणाऱ्या नागरी आणि वाहतूक क्षेत्रातील पंधरा नियोजनकारांनीही या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. (Road Safety Measures)

मुंबईत रस्ते, नागरिक, पादचारी, तसेच वाहने अशा सर्वच घटकांसाठी अधिकाधिक सुरक्षित आणि वापरासाठी अनुकूल असावेत, यादृष्टीने महानगरपालिका प्रयत्नशील आहे. जागतिक पातळीवर प्रचलित शहरी गमनशीलता आणि रस्त्त्यांची रचना मुंबईसारख्या महानगरात राबवून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यासाठी ही कार्यशाळा म्हणजे पहिले पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी दिली. रस्ते सुरक्षेमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या पादचारी, सायकलस्वार आणि दुचाकी स्वारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे, हादेखील यातील उद्देश असल्याचे महाले यांनी सांगितले.

विविध संस्थांच्या समन्वयातून पार पडलेल्या १ दिवसीय कार्यशाळेचा उद्देश हा प्रकल्पांची अंमलबजावणी करताना अभियंत्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे हा होता. सुरक्षित आणि शाश्वत रस्ते आराखड्यांसह हे रस्ते वापरासाठी सुलभ बनवणे हे कार्यशाळेचे उद्दिष्ट होते. हे लक्षात घेता मुंबईतील रस्ते सुरक्षितता, रस्त्यांचे आराखडे, प्रक्रिया, रस्त्यांसाठी चिन्हांचा आणि दिशादर्शकांचा वापर यासारख्या विषयांचा कार्यशाळेत समावेश होता. त्यासोबतच प्रात्यक्षिक म्हणून वरळी नाका परिसरात ५०० मीटर अंतर प्रत्यक्ष भेटीचेही आयोजन करण्यात आले. या भेटीदरम्यान रस्ते सुरक्षिततेच्या अनुषंगाने भेडसावणाऱ्या समस्या आणि दिव्यांग नागरिकांसाठीची आव्हाने यासारख्या बाबी समजून घेण्यात आल्या.

दरम्यान, अशा प्रकारचे कार्यशाळेचे आयोजन विभाग स्तरावरील अभियंत्यांसाठीही लवकरच करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या तसेच नागरी प्रशिक्षण व संशोधन संस्थेमध्ये देखील टप्पेनिहाय प्रशिक्षण देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. जेणेकरून संपूर्ण मुंबईतील रस्ते बांधणीमध्ये गुणवत्तेसह सुरक्षितता, सुलभता वाढीस लागेल. (Road Safety Measures)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.