Malini Rajurkar : सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन

28

शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर (Malini Rajurkar) यांचे निधन झाले आहे. त्या ग्वाल्हेर घराण्यातील शास्त्रीय गायिका होत्या. त्यांचे पार्थिव हैदराबाद येथील त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. मालिनी राजूरकर यांचा जन्म 8 जानेवारी 1941 रोजी झाला. त्यांचे बालपण राजस्थानात गेले. त्या तीन वर्षे अजमेरच्या सावित्री गर्ल्स हायस्कूल आणि कॉलेजमध्ये गणित शिकल्या. तिथेच त्यांनी गणित या विषयात पदवी घेतली. अजमेर संगीत महाविद्यालयातून गोविंदराव राजूरकर आणि त्यांचा पुतण्या वसंतराव राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत निपुण अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर वसंतराव राजूरकर यांच्यासोबत मालिनी यांनी विवाह केला.

मालिनी यांनी अनेक संगीत महोत्सवात त्यांची कला सादर केली. गुणीदास संमेलन मुंबई, तानसेन समारोह (ग्वाल्हेर), सवाई गंधर्व महोत्सव (पुणे) आणि शंकर लाल महोत्सव (दिल्ली) या संगीत महोत्सवामध्ये मालिनी राजूरकर यांनी त्यांची कला सादर केली. मालिनी राजूरकर यांनी टप्पा आणि तराना या गायकीवर विशेष प्रभुत्व होते. ‘नरवर कृष्णासमान’ आणि ‘पांडू-नृपती जनक जया’ ही त्यांनी गायलेली दोन मराठी नाट्यगीते लोकप्रिय ठरली.

(हेही वाचाG20 बैठकीत झळकणार ऋग्वेदाचे हस्तलिखित)

अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव

मालिनी राजूरकर (Malini Rajurkar) यांच्यावर गायकीवर संगीततज्ज्ञ के.जी. गिंडे, जितेंद्र अभिषेकी आणि कुमार गंधर्व यांचा प्रभाव होता. त्यांनी 1980 साली अमेरिकेत आणि 1984 साली इंग्लंडमध्ये संगीत दौरे केले होता. 1970 पासून त्या हैदराबाद येथे राहात होत्या. मालिनी राजूरकरांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. त्यांना 2001 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर 2008 मध्ये त्यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. बागेश्री, यमन आणि मारवा इत्यादी रागांचे त्यांनी गायन केले.

मालिनीताई राजुरकर यांचा अल्प परिचय 

मालिनीताई राजुरकर यांचा जन्म ७ जानेवारी १९४१ रोजी अजमेर येथे झाला, माहेरच्या त्या प्रभा वैद्य. त्यांचे घराणे मूळचे इंदूरचे असले तरी त्यांच्या वडिलांचे नोकरीनिमित्त वास्तव्य अजमेर येथे होते. त्यामुळे मालिनीताईंचे सर्व शिक्षण अजमेर येथेच पार पडले. त्यावेळी अजमेर येथे शाळेमध्ये संगीत शिक्षण सक्तीचे होते. त्यामुळे शाळेतील संगीताच्या तासाला जे संगीत कानावर पडे तेवढाच त्यांचा गाण्याचा संबंध येत असे. त्यांच्या एकूण जडणघडणीवर त्यांचे काका गंगाधर वैद्य यांचा फार प्रभाव होता, काका व वडील या दोघांना नाट्यसंगीताची फार आवड होती. त्यांच्या आईना उत्तम स्वरज्ञान होते व त्या भजन, पंचपदी व त्रिपदी वगैरे म्हणत असत. त्यामुळे घरात संगीत प्रिय वातावरण होते. त्यावेळी मालिनीताईंना वयोमानाने सिनेसंगीत आवडत असे. पण त्याला मात्र वडील व काकांचा विरोध होता. त्यावेळी बाहेरही गाण्याचे फारसे वातावरण नव्हते. गणपती उत्सवात कधी तरी गाणे ऐकावयास मिळत असे. मध्यमवर्गीय विचारधारणेनुसार त्यांना संगीता पेक्षा गणितात प्रावीण्य मिळवण्याची इच्छा होती. तथापि वडील व काका यांच्या इच्छेमुळे त्या गाण्याकडे वळल्या. त्यांच्या प्रेरणेने त्या संगीताकडे गांभीर्याने पाहू लागल्या व तेच त्यांनी जीवित ध्येय मानले. अजमेर संगीत विद्यालयाचे प्राचार्य पं. गोविंदराव राजुरकर हे मालिनीताईचे प्रथम गुरु होते, त्यांनी आपले संगीत शिक्षण ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं. राजाभाऊ पूछवाले यांच्याकडे घेतले होते. ते एक उत्कृष्ट शिक्षक होते. मालिनीताईंना त्यांच्या रूपाने एक उत्कृष्ट मार्गदर्शक लाभला. पं. राजुरकर यांच्याकडील शिक्षणा मुळे त्यांना भारत सरकारची संगीत निपुण ही पदवी मिळाली. त्यांनी १९६० साली गणित हा विषय घेऊन बी.ए. (ऑनर्स) ही पदवी ही मिळवली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.