Best Open Deck Bus : बेस्ट नवीन ‘ओपन डेक’ गाड्यांची करणार खरेदी, तोपर्यंत दुमजली वातानुकुलित बसमधून अनुभवता येणार मुंबई दर्शन

38
Best Open Deck Bus : बेस्ट नवीन 'ओपन डेक' गाड्यांची करणार खरेदी, तोपर्यंत दुमजली वातानुकुलित बसमधून अनुभवता येणार मुंबई दर्शन
Best Open Deck Bus : बेस्ट नवीन 'ओपन डेक' गाड्यांची करणार खरेदी, तोपर्यंत दुमजली वातानुकुलित बसमधून अनुभवता येणार मुंबई दर्शन

बेस्ट उपक्रमामार्फत ‘मुंबई दर्शन’ या सेवेकरिता ‘ओपन ड्रेक’ बसगाड्यांचे आयुर्मान 15 वर्षे पूर्ण होत असल्याने शासन निर्णयाप्रमाणे ०५ ऑक्टोबर २०२३ रोजी मोडित काढण्यात येणार आहेत. (Best Open Deck Bus) त्यामुळे भविष्यातही मुंबई दर्शनची सेवा अविरत सुरु ठेवण्यासाठी उपक्रमाच्या वतीने नविन दुमजली ‘ओपन डेक’ बसगाड्या खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. दरम्यान, दुमजली ओपन डेक बसगाड्यांची खरेदी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, ‘मुंबई दर्शन बससेवा खंडीत हाऊ नये, याकरिता बेस्ट उपक्रमातर्फे वातानुकूलित दुमजली इलेक्ट्रिक बसगाडया ‘मुंबई दर्शन’ करता सुरु ठेवण्यात येणार असल्याचे बेस्ट प्रशासनाने जाहीर केले आहे.

(हेही वाचा – Tata Haldiram Deal : टाटा समुहाचा हलदीराम विकत घेण्याचा प्रयत्न?)

बेस्ट उपक्रमातर्फे मागील अनेक वर्षापासून पर्यटकांकरिता ‘मुंबई दर्शन सेवा पुरविली जात आहे. या मुंबई दर्शन’ सेवे मार्फत मुंबई दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांना मंत्रालय, विधानभवन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सी.एस.एमटी, मुंबई महानगरपालिका-बीएमसी, हुतात्मा चौक, हॉर्निमन सर्कल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया-आरबीआय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्राहालय-प्रिंन्स ऑफ वेल्स म्युझियम, एशियाटीक लायब्ररी, जुने कस्टम हाऊस, एनसीपीए, मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, चर्चगेट स्थानक, ओव्हल मैदान, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ आदी ठिकाणच्या मार्गावरून फिरवली जाते.

बेस्ट उपक्रमामार्फत ‘मुंबई दर्शन’ या सेवेकरिता ‘ओपन ड्रेक’ बसगाड्या सुरु करण्यात आल्या आहेत; परंतु बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये सद्या असलेल्या ३ ‘ओपन डेक’ बसगाड्यांचे आयुर्मान पंधरा वर्षे पूर्ण होत असल्याने शासन निर्णयाप्रमाणे या गाड्या ०५ ऑक्टोबर २०२३ रोजी मोडित काढण्यात येणार आहेत. मुंबईतील जनतेचा आणि पर्यटकांचा ओपन डेक बसगाड्यां बाबतचे असलेले प्रेम आणि त्यांना या बसगाड्यांमधून मिळणारा वेगळा अनुभव लक्षात घेता तसेच, ‘मुंबई दर्शन’ बस सेवेला प्रवाशांचा मिळणारा चांगला प्रतिसाद विचारात घेता, बेस्ट उपक्रमातर्फे नविन दुमजली ‘ओपन डेक’ बसगाड्या खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. जेणेकरून पुढील कालावधीत पर्यटकांना ‘मुंबई दर्शन’ बससेवा ‘ओपन डेक दुमजली बसगाड्यांमधून अनुभवता येणार आहे. (Best Open Deck Bus)

दुमजली ओपन डेक बसगाड्यांची खरेदी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, ‘मुंबई दर्शन बससेवा खंडीत होऊ नये याकरिता बेस्ट उपक्रमातर्फे वातानुकूलित दुमजली इलेक्ट्रिक बसगाडया ‘मुंबई दर्शन’ करीता सुरु करण्यात येत आहेत. सोमवार ते शुक्रवार या दिवशी ३ वातानुकूलित दुमजली बसगाड्या आणि शनिवार व रविवार या दिवशी ५ वातानुकूलित दुमजली बसगाड्या पर्यटकांकरिता सुरु ठेवण्यात येणार आहेत. या बसगाड्या पर्यावरणपुरक असून, या बसगाड्यांमधून कोणत्याही प्रकारचे ध्वनी किंवा वायु प्रदुषण होत नाही. वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बसमध्ये दोन्ही बाजूने स्वयंचलित प्रवेशद्वारे असल्याने प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने बसमध्ये सीसीटीव्हीचीही सुविधा देण्यात आली आहे. या शिवाय प्रवाशांच्या सोयीकरिता मोबाइल चार्जिंगची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे.

त्यामुळे ‘ओपन डेक’ दुमजली बसगाड्यांची खरेदी प्रक्रिया होईपर्यंत पर्यटकांकरिता ‘मुंबई दर्शन’ या सेवेकरिता प्रवर्तित करण्यात येणाऱ्या वातानुकूलित दुमजली बसगाड्यांचा पर्यटकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाच्या वतीने करण्यात येत आहे. (Best Open Deck Bus)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.