Teeth Test : मुंबईसह पालघरमधील १२०० शाळकरी मुलांच्या दातांची तपासणी

विविध शाळांमधील एक हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी

134
Teeth Test : मुंबईसह पालघरमधील १२०० शाळकरी मुलांच्या दातांची तपासणी
Teeth Test : मुंबईसह पालघरमधील १२०० शाळकरी मुलांच्या दातांची तपासणी

मुलांना लहान वयातच दातांना कीड लागणे, हिरड्या खराब होणे अशा अनेक समस्यांमुळे लहान मुलांचे दात लवकर खराब होतात. याच कारणास्तव फोर्ट येथील शासकीय दंत महाविद्यालयाने शाळकरी विद्यार्थ्यांना दंत सुरक्षा पुरविण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार शासकीय दंत महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी नुकतीच मुंबई व पालघरमधील विविध शाळांमधील एक हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी केली.

लहान मुले विविध गोड पदार्थ, चॉकलेटसारखे पदार्थ जास्त खात असल्याने त्यांना अनेक दातांच्या समस्या निर्माण होत असतात. या दातांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुंबईतील तीन शाळा आणि पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील शाळकरी मुलांच्या दातांची तपासणी करण्यात आली.

मुंबईतील यंग लेडीज हायस्कूलमधील २५०, ॲलेक्झांड्रा गर्ल्स इंग्लिश इन्स्टिट्यूटमधील ६२३, बांद्रा हिंदू असोसिएशनचे २०० विद्यार्थ्यांची अशी १०७३ विद्यार्थ्यांची तपासणी केली तर, पालघरमधील वाकी गावातील १५० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. तपासणी केलेल्या विद्यार्थ्यांचे निरीक्षण करून त्यांना पुढील उपचारांसाठी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विभागांतर्फे उपचार करण्यात येणार आहेत, असे डॉक्टरांच्यावतीने सांगण्यात आले.

(हेही वाचा – मुंबई पाल‍िका रुग्णालयातील औषध खरेदीची चौकशी होणार)

डॉक्टरांचे आवाहन –

  • अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर चुळ भरा.
  • दिवसातून दोनदा दात स्वच्छ घासा.
  • चिकटपदार्थ खाल्ल्यास ब्रशने दात घासा.
  • लहान मुले सतत चॉकलेट किंवा चिकट पदार्थ खात असल्यास त्यांची दर तीन महिन्यांनी दंत तपासणी करा.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.