‘या’ दिवशी मुंबई पालिकेतील पालकमंत्री कार्यालय बंद होणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानपरिषदेत माहिती

108
'या' दिवशी मुंबई पालिकेतील पालकमंत्री कार्यालय बंद होणार
'या' दिवशी मुंबई पालिकेतील पालकमंत्री कार्यालय बंद होणार

मुंबई महापालिकेत सुरू केलेल्या पालकमंत्री कार्यालयावर अनेक आक्षेप घेण्यात आले. पण लोक तक्रारी घेऊन आले, तर त्यांना भेटण्यासाठी त्याची उपयोगिता अधिक आहे. ज्या दिवशी निवडणुका होतील आणि नवे नगरसेवक येतील, तेव्हा ते कार्यालय बंद करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली.

विरोधी पक्षाच्या वतीने विधानपरिषदेत दाखल अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईतील सर्व ३६ विधानसभा क्षेत्रासाठी प्रत्येकी ३५ कोटी रुपये तरतूद मुंबई महापालिकेने केली आहे. त्यामुळे नगरसेवक नाही, म्हणून विकास कामे थांबली, हे सत्य नाही. निवडणूक घेण्याचा अधिकार राज्य सरकारकडे नाही. हा संपूर्ण अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. आरक्षण, वॉर्ड अशा सर्व केसेस एकत्र झाल्या आणि त्यावर ‘जैसे थे’चे आदेश झाले. आम्हालाही निवडणुका हव्या आहेत. मुंबईसह सर्व महापालिका निवडणुका व्हाव्या, अशी आमची इच्छा आहे. पण याचा निर्णय आयोगाला घ्यायचा आहे.

बारसू रिफायनरी ही महाराष्ट्राच्या हिताची आहे. सरकारी कंपन्यांसोबत जे गुंतवणूक करणार होते, ते आता पाकिस्तानात गेले. ज्यांना देशाचा विकास नको, तीच लोकं आरे आंदोलनात, तीच लोकं बारसू आंदोलनात, तीच लोकं नर्मदेच्या आंदोलनात. कातळशिल्प आपण जपणारच आहोत, काहीही झाले तरी त्यांना धक्का लागू देणार नाही. पण कुठेतरी देशाचा विचार केला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा – Jalgaon Crime : जळगावमध्ये ७ वर्षीय मुलीवर अत्याचार करत तरुणाने केली हत्या; मृतदेह लपवला गोठ्यात)

औरंगजेबाचे महिमामंडन सहन करणार नाही

  • राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला. एकाच वेळी अनेक जिल्ह्यात औरंगजेबाचे फोटो, स्टेटस ठेवण्याचे प्रकार झाले. यामागे कोण लोक हे लक्षात आले आहे.
  • धर्मांचे राजकारण महाराष्ट्रात होणार नाही, मात्र औरंगजेबाचे महिमामंडन अजिबात सहन करणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.