मोठ्या संख्येने मतदान करून मोदीजींना पुन:श्च पंतप्रधान करा; केंद्रीय मंत्री Piyush Goyal यांचे आवाहन

पियूषजींनी मोदीजींचे मानले आभार, प्रतिकूल स्थितीमध्ये मोदीजींनी देशाची सूत्रे स्वीकारली मतदान करून पुनः श्च पंतप्रधान करा

160
मोठ्या संख्येने मतदान करून मोदीजींना पुन:श्च पंतप्रधान करा - केंद्रीय मंत्री Piyush Goyal यांचे आवाहन

“मोदी पंतप्रधान (PM Narendra Modi) होण्यापूर्वी आपल्या देशात महागाई, रूपयाचे अवमूल्यन, जीडीपी दर सतत उतरतील आलेला असे असंख्य प्रश्न होते. भारतावर ३० मिलीयनचे कर्ज होते अशा प्रतिकूल स्थितीमध्ये मोदीजींनी देशाची सूत्रे स्वीकारली. मागील १० वर्षांत वैश्विक पातळीवर भारताची प्रतिमा उंचावण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे अभूतपूर्व योगदान आहे. ही निवडणूक भारताचे भविष्य ठरवणारी आहे. येत्या २० मे ला (20th May) आळस झटकून मतदान‌     (Voting 2024) करण्यासाठी घराबाहेर निघा. मोदीजींना पुनः श्च पंतप्रधान करा” असे आवाहन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Union Minister Piyush Goyal) यांनी केले. ते भाजपा उद्योग आघाडीतर्फे साई पॅलेस, मालाड (प) येथे शनिवारी झालेल्या संवाद कार्यक्रमात बोलत होते. (Piyush Goyal)

(हेही वाचा – Jio, Airtel Rate Hike : लोकसभा निवडणुकीनंतर मोबाईल रिचार्जचे दर वाढणार?)

पियूषजींनी मोदीजींचे मानले आभार 

पंतप्रधान मोदी प्रत्येक गोष्टीचा बारकाईने, चौफेर विचार करतात हे केवडिया येथे मोदीजींच्या कल्पनेतून‌ साकारलेल्या भव्य सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे उदा.देऊन‌ पटवून दिले. आदिवासी पट्टा असलेल्या केवडियामध्ये (Kevadiya Tourism) हे स्थळ पर्यटनासाठी प्रसिद्ध झाले आहे. पक्की घरे, इको-टूरिझझम, हॉटेलव्यवसाय, रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. यासाठी पीयूषजींनी मोदीजींचे आभार मानले. यावेळी खा. गोपाळ शेट्टी, (MP Gopal Shetty), मुंबई भाजप व्यापार आघाडी अध्यक्ष शंकर भानुशाली, व्यापारी राकेश जैन, कार्यक्रम संयोजक अमर शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. (Piyush Goyal)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.