New Voters : मुंबईत वाढले १ लाख १० हजारांहून अधिक नवमतदार! कोणत्या मतदार संघांत किती नव मतदार, जाणून घ्या

795
New Voters : मुंबईत वाढले १ लाख १० हजारांहून अधिक नवमतदार! कोणत्या मतदार संघांत किती नव मतदार, जाणून घ्या
New Voters : मुंबईत वाढले १ लाख १० हजारांहून अधिक नवमतदार! कोणत्या मतदार संघांत किती नव मतदार, जाणून घ्या
विशेष प्रतिनिधी,मुंबई

मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघांमध्ये यंदा तब्बल १ लाख १० हजार ७४२ हे नवमतदार असून वय वर्षे १८ ते १९ वयोगटातील हे मतदार प्रथमच मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवलेल्या मतदार नोंदणीनुसार या तब्बल १ लाख १०हजार नवमतदारांची भर संपूर्ण मुंबईत पडली आहे. त्यामुळे प्रथमच निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या या मतदारांचा कल कोणत्या पक्षाकडे आहे आणि प्रथमच ते कोणत्याही पक्षाच्या बाजुने मतदान करतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

मुंबई शहरामध्ये एकूण २४ लाख ४७ हजार ८२६ मतदारांची नोंद असून उपनगरांमध्ये ७३ लाख ०१ हजार २१७ मतदारांची नोंद आढळून आली आहे. शहरांमध्ये दक्षिण मुंबई आणि दक्षिण मुंबईतील चार विधानसभा मतदारांचा समावेश आहे. तर उपनगरांमध्ये दक्षिण मध्य मुंबई लोकसभा क्षेत्रातील अणुशक्ती नगर व चेंबूर या विधानसभांचा तसेच उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व अर्थात ईशान्य, मुंबई उत्तर मध्य आदी लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे.

(हेही वाचा – BMC : अखेर महापालिका आयुक्त दोन्ही अतिरिक्त आयुक्तांसह उतरले रस्त्यावर)

या सहाही लोकसभा मतदार संघांमध्ये सर्वांधिक नव मतदारांची संख्या ही उत्तर मुंबईत नोंद आहे. या उत्तर मुंबईत २० हजार ५१९ नव मतदार आहेत, तर सर्वांधिक कमी नवमतदार (New Voters) हे हे दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईत आहेत. शहरातील या दोन्ही मतदार संघांमध्ये अनुक्रमे ११,७०० आणि ११,६२२ एवढया नव मतदारांची नोंद झाली आहे.

नवमतदारांची संख्या लोकसभा मतदार संघनिहाय

उत्तर मुंबई : २०,५१९( पुरुष : ११,६०१, स्त्री : ८,९१६)

मुंबई उत्तर पश्चिम : १६,५२९ ( पुरुष : ०९,२७७, स्त्री : ७,२५१)

मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य) :१६,७६८ ( पुरुष : ०९,६४८, स्त्री : ७,१२०)

मुंबई उत्तर मध्य : १६,८३७, ( पुरुष : ०९,७२२, स्त्री : ७,१२०)

मुंबई दक्षिण मध्य :११,६२२ ( पुरुष : ०६,६३६, स्त्री : ५,३०६)

मुंबई दक्षिण : ११,७०० ( पुरुष : ०६,२०२, स्त्री : ४,९२६)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.