BMC : अखेर महापालिका आयुक्त दोन्ही अतिरिक्त आयुक्तांसह उतरले रस्त्यावर

विभाग कार्यालयाच्या आढाव्यासह नाल्यांच्या कामांची केली पाहणी

8180
BMC : अखेर महापालिका आयुक्त दोन्ही अतिरिक्त आयुक्तांसह उतरले रस्त्यावर

मागील वीस दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त पदाचा भार स्वीकारल्यानंतर केवळ कार्यालयातच बसून विविध खात्यांचा आणि विभागांचा आढावा घेणाऱ्या भूषण गगराणी आणि त्यांच्यासह अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी व अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर हे अखेर रस्त्यावर उतरले. या तिन्ही अधिकाऱ्यांना मुंबईची तसेच येथील भौगोलिक परिस्थितीची माहिती नसल्याने आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास त्यांचा गोंधळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे, या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीतील विविध सेवासुविधांसह पायाभूत प्रकल्पांची माहिती जाणून घेण्याच्या सूचना केल्या जात आहे. त्यानुसार त्यांनी मंगळवारी एम पश्चिम विभाग कार्यालयाचा आढावा घेत या भागासह कुर्ला, घाटकोपर, भांडुप आदी परिसरातील नालेसफाई कामांची पाहणी केली. (BMC)

महापालिकेचे आयुक्त आणि दोन्ही अतिरिक्त आयुक्त हे नवखे

नालेसफाईच्या कामांमध्ये कुचराई झाल्यास यंदा मुंबईकर जाणार पुरात वाहून या आशयाचे वृत्त मागील ४ एप्रिल २०२४ रोजी हिंदुस्थान पोस्टने प्रकाशित केले होते. त्यात, मुंबईतील नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली असली तरी यंदा नालेसफाईच्या कामांमध्ये थोडीफार जरी कुचराई झाल्यास मुंबईकरांना पुरात वाहून जाण्याची वेळ येणार आहे. येत्या जुलै ते सप्टेंबर या कालावधी मुसळधार पावसाची शक्यता असून महापालिकेचे आयुक्त आणि दोन्ही अतिरिक्त आयुक्त हे नवखे आहे. मात्र, यासर्वांकडून अद्यापही कार्यालयात बसूनच विभाग आणि खात्यांचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे मुंबईतील नाल्यांसह रस्त्यांसह प्रकल्प कामांची माहिती प्रत्यक्ष स्थळी जावून केव्हा करणार असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे या वृत्तांत म्हटले होते. (BMC)

(हेही वाचा – Muslim : हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस सरकारकडून मुसलमानांचे लांगुलचालन; ईदच्या दिवशी मुसलमान महिलांना मोफत बससेवा)

गगराणी यांची ही मोठी कमजोरी

तसेच हिंदुस्थान पोस्टने महापालिका आयुक्तांसमोर अपेक्षांचा डोंगर या मथळ्याखाली लेख प्रकाशित केला होता. त्यात ‘आयुक्तांचा कच्चा दुवा म्हणजे त्यांनी मुंबईत कोणतेही पद भूषवलेले नाही. मुंबईचे स्थायिक असणे, राहणे याबरोबरच महापालिकेचा कारभार कसा चालतो, त्याअंतर्गत काय काय विभाग येतात, कुणाच्या अखत्यारित काय येते, कोणत्या प्राधिकरणाची जबाबदारी काय आहे, अशाप्रकारे सर्व महापालिका कारभाराची भौगोलिक आणि कामकाजाच्या दृष्टीने माहिती असणे आवश्यक असते. गगराणी यांची ही मोठी कमजोरी आहे. त्यामुळे जोवर ते महापालिकेचा कारभार आणि त्यांची कार्यपद्धती, अधिकाऱ्यांची जबाबदारी तसेच आणि महापालिका हद्दीसह विभाग आणि खात्याअंतर्गत केल्या जाणाऱ्या विविध कामांची उजळणी करून घेत नाही तोवर गगराणी यांना महापालिका समजून घेणे कठीण आहे.’ असे म्हटले आहे. (BMC)

एम पश्चिम विभाग कार्यालयात भेट

त्यानुसार, महापालिका आयुक्त तथा भुषण गगराणी यांनी पूर्व उपनगरांतील पावसाळापूर्व कामांच्या पाहणी दौऱ्यात एम पश्चिम विभाग कार्यालयात भेट देऊन विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर, आयुक्त गगराणी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. (BMC)

(हेही वाचा – Swatantryaveer Savarkar : भगूर येथे उभारण्यात आली हिंदुत्वाची गुढी !)

विमानतळ जागेजवळ मिठी नदीतून गाळ उपसा

सर्वप्रथम, चेंबूर स्थित पोस्टल कॉलनी येथील सखल भागात पावसाळी पाणी निचरा करणारी यंत्रणा पाहणी करून योग्य ते निर्देश दिले. यानंतर, एल विभाग अंतर्गत वांद्रे कुर्ला संकुलात, त्याचप्रमाणे कल्पना सिनेमा परिसरात विमानतळ जागेजवळ मिठी नदीतून गाळ उपसा करण्याच्या कामांची पाहणी केली. (BMC)

या नाल्यांची केली पाहणी

पूर्व उपनगरांतील पावसाळा पूर्व कामांच्या पाहणी दौऱ्यातील पुढील टप्प्यात, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी एन विभागात लक्ष्मी बाग नाला, एस विभागातील एपीआय नाला, वीर सावरकर मार्गावरील उषा नगर नाला, गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता जंक्शन वर भांडुपनजीक बॉम्बे ऑक्सिजन नाला आदी ठिकाणी भेट देवून नाल्यातून गाळ उपसा करण्याच्या कामांची मंगळवारी पाहणी केली. (BMC)

अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, सहआयुक्त चंद्रशेखर चोरे, उपआयुक्त देवीदास क्षीरसागर, उप आयुक्त विश्वास मोटे, उप आयुक्त उल्हास महाले, सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर, गजानन बेल्लाळे, सहायक आयुक्त भास्कर कसगीकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.