Jio, Airtel Rate Hike : लोकसभा निवडणुकीनंतर मोबाईल रिचार्जचे दर वाढणार?

मुख्य टेलिफोन कंपन्या आपले दर वाढवण्याच्या तयारीत आहेत

209
Jio, Airtel Rate Hike : लोकसभा निवडणुकीनंतर मोबाईल रिचार्जचे दर वाढणार?
Jio, Airtel Rate Hike : लोकसभा निवडणुकीनंतर मोबाईल रिचार्जचे दर वाढणार?
  • ऋजुता लुकतुके

भारती एअरटेल आणि जिओ (Jio) सारख्या मोठया दूरसंचार कंपन्या लोकसभा निवडणुकींनंतर (Lok Sabha elections) दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत. अँटिक स्टॉक ब्रोकिंग कंपनीने याविषयीचा अंदाज वर्तवला आहे. ही दरवाढ १७ टक्क्यांची असू शकते. देशात लोकसभेच्या निवडणुकीसाठी १९ एप्रिल ते १ जून दरम्यान मतदान होणार आहे. आणि ५ जूनला निवडणुकीचे निकाल जाहीर होतील.

त्यानंतर कंपन्यांचे प्री-पेड आणि पोस्ट पेड मोबाईल सेवेबरोबरच ५जी आणि इतर सेवांचं शुल्कही वाढणार आहे. फायबर स्टिक, टीव्ही चॅनल सेवा असे सगळेच दर येणाऱ्या काळात वाढतील अशी चिन्हं आहेत. तर काही ५ जी सेवांसाठी अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल.

(हेही वाचा – Fire : बीकेसी येथील सरकारी कार्यालयाला भीषण आग ; घटनास्थळावरील व्हिडीओ व्हायरल )

या दरवाढीचा सगळ्यात मोठा फायदा एअरटेल कंपनीला होईल. कारण, दर ग्राहकामागे कंपनीला होणारा फायदा २०८ रुपयांवरून थेट २८६ रुपयांवर पोहोचेल. कंपनीला दरवाढ, २जी सेवेचा विस्तार, ५जी नेटवर्कची आधुनिकता, फायबर टू होम नेटवर्क यांचा फायदा मिळून कंपनीचं कॅपेक्स कमी होईल, असा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे.

महत्त्वाचं म्हणजे या अहवालातून भारतीय दूरसंचार बाजारपेठही लक्षात येते. मागच्या साडेपाच वर्षांत एअरटेल आणि जिओ (Jio) कंपनीने देशात दूरसंचार सेवेचं जाळं वाढवत नेलं आहे. तर व्होडाफोन आणि बीएसएनएल यांची सेवा रोडावत चालली आहे. आयडिया व्होडाफोन कंपनीची बाजारातील हिस्सेदारी तर सप्टेंबर २०१८ नंतर निम्म्यावर आली असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तर जिओ (Jio) कंपनीची सगळयात जास्त भरभराट झाल्याचंही हा अहवाल सांगतो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.