Baramati Lok Sabha Constituency : विजय शिवतारे यांची बारामतीतून माघार; सुनेत्रा पवारांना पुरंदरमधून दीड लाख मते देण्याचा दिला ‘शब्द’ 

मी लोकसभेच्या तयारीसाठी जी काही यंत्रणा उभी केली होती ती सर्व यंत्रणाही सुनेत्रा पवार यांच्या प्रचारकार्यासाठी देऊ, असे शिवतारे म्हणाले.

111

शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या (Baramati Lok Sabha Constituency) निवडणुकीतून माघार घेतली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना शिवतारे म्हणाले, आम्ही पुरंदरमधून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना कमीत कमी दीड लाख मते देऊ. मी लोकसभेच्या तयारीसाठी जी काही यंत्रणा उभी केली होती ती सर्व यंत्रणाही सुनेत्रा पवार यांच्या प्रचारकार्यासाठी देऊ.

(हेही वाचा कल्याणमध्ये शिंदे विरुद्ध दिघे? Shivsena UBT ची उमेदवारी दिघे कुटुंबाकडे?)

काय म्हणाले शिवतारे? 

कोणत्याही स्थितीत बारामतीतून (Baramati Lok Sabha Constituency) ही निवडणूक लढवायचीच, असा निर्धार आम्ही केला होता. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत फोनवर झालेल्या चर्चेनंतरही आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम होतो. मात्र २६ तारखेला मला मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी खतगावकर यांचा फोन आला. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, आपल्या भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांची अडचण होत आहे. महायुतीचं वातावरण बिघडून राज्यात महायुतीचे १०-१५ खासदार पडू शकतात. मतांचं विभाजन होऊन महाविकास आघाडीचा फायदा होईल. मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीने हे सगळं सांगितल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोललो. त्यानंतर २८ तारखेला रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत माझी रात्री ११ ते २ अशी तब्बल तीन तास चर्चा झाली. या चर्चेत मी विकासकामांबद्दल असलेल्या माझ्या मागण्या मांडल्या. त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद आल्याने मी या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, असे शिवतारे म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.