IPL 2024 : विराट आणि गौतम गंभीरने जुनं वैमनस्य टाकलं मागे 

IPL 2024 : कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामन्यात दोघं हस्तांदोलन करताना दिसले 

130
IPL 2024 : विराट आणि गौतम गंभीरने जुनं वैमनस्य टाकलं मागे 
IPL 2024 : विराट आणि गौतम गंभीरने जुनं वैमनस्य टाकलं मागे 
  • ऋजुता लुकतुके

बंगळुरू आणि कोलकाता (RCB VS KKR) यांच्या दरम्यान आयपीएलचा (IPL 2024) सामना असेल तर एक नजर विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यावर असतेच. याआधी या दोघांचे मैदानावर अनेकदा खटके उडाले आहेत. पण, शुक्रवारच्या चिन्नास्वामी मैदानावरील (Chinnaswamy Maidana) सामन्यात ही कोंडी फुटलेली दिसली. दोघांनी आपले मतभेद बाजूला सारून एकमेकांना आलिंगनही दिलं. नंतर दोघं हसत हसत गप्पा मारताना दिसले. (IPL 2024)

(हेही वाचा- Archana Patil : काँग्रेसला पुन्हा मोठा झटका; डॉ. अर्चना पाटील यांचा भाजपात प्रवेश)

सोशल मीडियावर हा व्हीडिओ लगेचच व्हायरल झाला आहे.

या सामन्यापूर्वी कोलकाता संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरच दोघांमधील वादाला खतपाणी घालेल असं एक ट्विट प्रसारित करण्यात आलं होतं. यात कोलकाता संघाचा मेंटॉर असलेला गंभीर ठळकपणे दिसतोय. त्याच्यापासून कितीतरी दूर मागे अंधूकपणे एक व्यक्ती दिसते, ती विराट कोहली (Virat Kohli) आहे. विराट गंभीरकडे टक लावून पाहतोय, असा तो फोटो आहे. (IPL 2024)

(हेही वाचा- IPL 2024, RCB vs KKR : यजमान बंगळुरूवर कोलकाताचा दिमाखदार विजय )

पण, सुदैवाने दोघांमध्ये कुठलीही खडाजंगी झाली नाही. उलट अडीच मिनिटांच्या विश्रांतीदरम्यान दोघं भेटले तेव्हा त्यांनी एकमेकांना मिठी मारली. आणि त्यांच्यात चर्चाही झाली. एरवी या दोघांमध्ये मैदानावरच भांडणाचे अनेक प्रसंगी पूर्वी ओढवले आहेत. ताजा प्रसंग आहे तो गेल्यावर्षीचा. गौतम गंभीर (Gautam Gambhir) तेव्हा लखनौ सुपरजायंट्स संघाशी  निगडित होता. सामन्यादरम्यान लखनौचा खेळाडू नवीन उल हक आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात बाचाबाची झाली होती. (IPL 2024)

(हेही वाचा- Archana Patil : काँग्रेसला पुन्हा मोठा झटका; डॉ. अर्चना पाटील यांचा भाजपात प्रवेश)

त्या सामन्यानंतर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) मैदानावर उतरत विराट कोहलीशी वाद घातला होता. कारण, अर्थातच गुलदस्त्यात आहे. २०१३ मध्येही एकदा दोघं मैदानावर एकमेकांशी वाद घालताना दिसले होते. खरंतर दोघं दिल्लीतून येतात. रणजी सामन्यांत एकत्र खेळलेले आहेत. पण, त्यांच्यातील हा वाद जुना आणि वारंवार उफाळून येणारा आहे. पण, यंदा आश्चर्यकारकरित्या दोघं एकमेकांशी बोलताना दिसले आहेत. (IPL 2024)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.