Archana Patil : काँग्रेसला पुन्हा मोठा झटका; डॉ. अर्चना पाटील यांचा भाजपात प्रवेश

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये अधिकृतपणे पक्ष सोडला. त्यांचा राजीनामा हा महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का होता. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला.

223
Archana Patil : काँग्रेसला पुन्हा मोठा झटका; डॉ. अर्चना पाटील यांचा भाजपात प्रवेश

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चकुरकर (Archana Patil) यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला.

(हेही वाचा – Shinde Group : मुख्यमंत्री शिंदेंची अनुपस्थिती; तरीही शिंदे गटाची प्रचाराची ठरली रणनीती)

अशोक चव्हाण यांच्यानंतर अर्चना पाटील (Archana Patil) यांचा पक्षप्रेवेश भाजपासाठी फार महत्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे अर्चना पाटील चाकूरकर या अमित देशमुखांविरोधात विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची देखील चर्चा आहे.

पाच वर्षांपूर्वी डॉ. अर्चना पाटील (Archana Patil) भाजपात प्रवेश करणार होत्या. पण काही कारणास्तव त्यांनी पक्षप्रवेश थांबवला. मात्र, त्यांचे सासरे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांचे पुत्र बासवराज पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. अशोक चव्हाण यांनी आधीच भाजपात प्रवेश केला आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : शरद पवार गटाची पहिली यादी आज जाहीर होणार; कोणाला मिळणार संधी ?)

अनेकांनी सोडली काँग्रेसची साथ :

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये अधिकृतपणे पक्ष सोडला. त्यांचा राजीनामा हा महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का होता. त्यानंतर त्यांनी भाजपात (Archana Patil) प्रवेश केला.

माजी खासदार मिलिंद देवरा यांनी जानेवारी २०२४ मध्ये पक्षाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या कुटुंबाचा पक्षाशी असलेला ५५ वर्षांचा संबंध संपुष्टात आणला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

(हेही वाचा – Rameshwaram Cafe Blast : रामेश्वर कॅफे स्फोटाच्या २ आरोपींचे फोटो जारी; माहिती देणाऱ्यांना १० लाखांचे बक्षीस)

महाराष्ट्राचे आणखी एक प्रभावशाली नेते बाबा सिद्दीकी यांच्यासमवेत बाबा सिद्दीकी यांनी ८ फेब्रुवारी २०२४ रोजी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Archana Patil)

काय म्हणाल्या अर्चना पाटील ?

भाजपामध्ये पक्षप्रवेश करतांना (Archana Patil) अर्चना पाटील चाकूरकर म्हणाल्या की, “मी गेली २० वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करते. माझा हा राजकीय प्रवासाचा निर्णय आहे. याचा श्री गणेशा मी आजपासून करत आहे. मोदी साहेबांचा प्रवास आम्ही बारकाईन बघत होतो. संसदेतले पहिले महिला विधेयक पारीत झाले, तो एक ऐतिहासिक निर्णय होता. आरक्षणामुळे महिलांना संधी मिळेल. देवेंद्र जी तुम्ही जी जबाबदारी द्याल ती १०० टक्के पार पाडीन, असे अर्चना पाटील चाकूरकर म्हणाल्या. (Archana Patil)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.