-
प्रतिनिधी
Vidhan Parishad Election महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या विधान परिषदेच्या १७ जागांच्या निवडणुकीसाठी आता महायुतीमध्ये हालचालींना वेग आला आहे. जागावाटपावरून निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागावाटपाचे गणित आता अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट केले आहे. (Vidhan Parishad Election)
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७ जागांवर आपला दावा ठोकला आहे. यामध्ये विद्यमान ५ जागांसह नव्याने ताकद वाढलेल्या आणखी २ जागांचा समावेश आहे. आपल्या या मागणीच्या पार्श्वभूमीवर आज ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत जागावाटपाच्या मुद्द्यावर एकमत होत असल्याचे संकेत मिळत आहेत. (Vidhan Parishad Election)
(हेही वाचा – IPL 2026 : सामन्यानंतर विराट, ट्रॅव्हिस हेड यांनी हस्तांदोलन नाकारलं; मैदानावरील भांडणाची परिणिती)
याबाबत अधिक माहिती देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “महायुतीमध्ये जागावाटप करताना आम्ही नेहमीच ‘सिटिंग-गेटिंग’ हा निकष लावला आहे, ज्याचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही यशस्वी वापर झाला होता. त्यानुसार, ज्या पक्षाचा उमेदवार सध्या निवडून आला आहे, ती जागा त्या पक्षाला मिळणे नैसर्गिक आहे. उर्वरित जागांबाबत चर्चा करताना संबंधित पक्षाचे संख्याबळ विचारात घेऊन निर्णय घेतला जात आहे.” (Vidhan Parishad Election)
काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पक्षाची वाढलेली ताकद पाहता ७ जागांची मागणी लावून धरली होती. हा दावा मान्य होणार की इतर घटकांचा विचार होणार, यावर आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आगामी बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. या बैठकीनंतर महायुतीच्या जागावाटपाचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार असून, विधान परिषदेच्या १७ जागांचा हा राजकीय पेच लवकरच निकालात निघण्याची चिन्हे आहेत. (Vidhan Parishad Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

