वेदांताचे खापर शिंदे-फडणवीस सरकरवर फोडू नका – उदय सामंत

97

वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात न येता गुजरातमध्ये जाणार ही खेदाची बाब आहे, पण याचे खापर शिंदे-फडणवीस सरकारवर फोडू नका, असे वक्तव्य राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केले.

वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याने जे काही होते ते सगळे वाईट होते ते आमच्यामुळे आणि चांगले घडते ते तुमच्यामुळे असे होत नाही, असे मंत्री उदय सामंत म्हणाले. वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात येत असल्याने शिंदे-भाजप सरकारवर चहुबाजूंनी टीका होत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर ‘हे मोदी-शहांचे हस्तक असल्याने यापुढे असेच होणार’, अशी टीका केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांनीही सरकारवर टीका केली. यावर शिंदे सरकारमधील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले.

(हेही वाचा वेदांता-फॉक्सकॉनवरील वादावरुन मोदींचा शिंदेंना फोन, म्हणाले…)

काय म्हणाले उद्योगमंत्री सामंत? 

शिंदे-फडणवीस सरकार येऊन फक्त दोन महिने झाले आहेत. मात्र मागील सात महिन्यांतील महाराष्ट्र सरकारच्या धोरणामुळे हे अपयश आले आहे. वेदांता कंपनीला गुजरातने जमीन कशी दिली, तशी महाविकास आघाडी सरकारने द्यायची होती. ही राजकारणातली वाईट प्रवृत्ती आहे, तिचा मी जाहीर निषेध करतो. हा प्रोजेक्ट इथे आणण्यासाठी ८ ते ९ महिन्यांपासून प्रयत्न करत होतो. अनेक योजना शासनासमोर ठेवल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वीच शिंदे-फडणवीसांचे सरकार आले. वेदांताला आणखी काही देता येईल का, याविषयी चर्चा झाल्या. स्वतः अनिल अग्रवाल यांच्याशी फडणवीस यांनी चर्चा केली होती. पण मागचा काही अनुभव पदरी आलेला असताना त्यांनी प्रकल्प गुजरातला हलवण्याचे ठरवले, असेही उद्योगमंत्री सामंत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्यात याच तोडीचा किंबहुना यापेक्षा मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्राला, युवा पिढीला देऊ, जो रोजगार अपेक्षित आहे, तो आम्ही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.