नितीन गडकरी पुढच्या निवडणुकीतही दिसणार, दिले संकेत…

99
भाजपाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केंद्रीय समितीमधून बाजूला केले, त्यामुळे भाजपने गडकरी यांना निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त करण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरूवात केली आहे का, अशी चर्चा सुरु झाली असतानाच केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मात्र ते पुढील निवडणूकही लढवणार आहेत. याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

मते द्यायचे तर द्या… 

मुंबईतील अंधेरी येथील टऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट’च्या दीक्षांत कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले की, लोक ज्यांना निवडून द्यायचे त्याला निवडून देतात. लोकांना चांगले काम करणारा हवा असतो. निवडणुकीत जिंकण्यासाठी मी आयुष्यात कोणाच्या गळ्यात हार घातला नाही. माझ्या स्वागताला किंवा मला पोहचवायला एकही माणूस येत नाही. मी स्वत:चा कटआउट लावत नाही आणि दुसऱ्याचाही कटआउट लावत नाही, मला मते द्यायचे तर द्या, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी स्वतःची भूमिका मांडली.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टोल द्यायला काय हरकत 

मुंबई-पुणे महामार्ग बांधला तेव्हा टोलच्या नावाने ओरड सुरू झाली होती. मात्र तुमचा वेळ वाचला, वाहतूक कोंडी कमी झाली, पेट्रोल डिझेलची बचत झाली, मग त्याचे पैसे टोलला द्या, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि सी लिंकचे पैसे वसूल झाले असल्याचे सांगत लोकांना तुम्ही चांगली सेवा दिल्यास ते पैसे काढण्यास तयार होतील, असेही गडकरी यांनी सांगितले. आता तुम्ही नरिमन पॉईंट ते वसई असा प्रवास अवघ्या 15 मिनिटात करणार आहात. त्यासाठी काम सुरू आहे, असेही मंत्री गडकरी म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.