शाळकरी मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढवा, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या राज्यांना सूचना

123

देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याचे पाहायला मिळत आहे. देशात दिवसेंदिवस पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालावर नजर टाकली तर, गेल्या 3 दिवसांपासून देशात दररोज 8 हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केले आवाहन

या चर्चेदरम्यान, त्यांनी राज्यांना महत्त्वाच्या सूचना देखील केल्या आहेत. राज्यांनी शाळेत जाणाऱ्या मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी केले. तसेच ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा बूस्टर डोस मिळेल, याकडे लक्ष द्यावे अशा सूचनादेखील त्यांनी केल्या आहेत.

(हेही वाचा – दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना झटका, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी)

राज्यांनी सतर्क रहावे, कोरोनाचा धोका संपलेला नाही

आढावा बैठकीत राज्यांना सतर्क करत ते म्हणाले, कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. राज्यांमध्ये वाढत्या रूग्णसंख्येमुळे आपण सतर्क राहावे आणि कोविड नियमांचे पालन करावे. जिनोम सिक्वेन्सिंग बळकट करण्याकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी आवाहन केले. आजपासून शाळा सुरू झाल्या आहे. त्यातच देशात कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसतेय. त्यामुळे शाळकरी मुलांचे लसीकरण त्वरीत करा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.