EVM VVPAT वर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

फक्त संशयाच्या आधारावर आम्ही आमचा निकाल जारी करु शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

129
EVM VVPAT वर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) सह ईव्हीएम वापरुन सर्व मतांची पडताळणी करण्याच्या मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी आपला निर्णय राखून ठेवला. त्यावर सुप्रीम कोर्ट (Suprime Court) निकाल देईल, अशी अपेक्षा होती. मात्र, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याकडून काही प्रश्नांवर स्पष्टीकरण मागितल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. बुधवारी सकाळी सुनावणी सुरू झाली तेव्हा न्यायालयाने निवडणूक आयोगाकडून (Election Commission) काही प्रश्नांवर स्पष्टीकरण मागवले होते.  (EVM VVPAT)

फक्त ईव्हीएम व्हीव्हीपॅटवर संशय आहे म्हणून आम्ही आदेश कसा द्यायचा?

ईव्हीएमवरच्या सुनावणीबाबत बोलताना न्या. दीपांकर दत्ता (Justice. Dipankar Dutta) हे प्रशांत भूषण यांना म्हणाले की ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर संशय आहे या आधारावर आम्ही आदेश कसा द्यायचा? जो अहवाल आम्हाला देण्यात आला आहे त्यानुसार ईव्हीएम हॅक केल्याची किंवा त्यात काही गडबड केल्याची एकही घटना घडलेली नाही. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. त्यावर आमचं नियंत्रण नाही. काही सुधारणा हव्या असतील तर आम्ही त्या सुधारा हे सांगू शकतो. (EVM VVPAT)

(हेही वाचा – Sam Pitroda यांच्या वारसा करावरील विधानावरून PM Narendra Modi यांचा हल्लाबोल; काँग्रेस की लूट जिंदगी के साथ भी, बाद भी ) 

निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने विचारले ‘हे’ प्रश्न

  • मायक्रो कंट्रोलर, कंट्रोलिंग युनिटमद्धे असते का ? की ईव्हीएममध्ये 
  • सिंबल लेबल युनिट किती आहेत, चिप कुठे असते ?
  • या चिपचा वापर एकदाच करता येतो का ?
  • ईव्हीएम आणि vvpat, मतदानानंतर सील करण्यात येते का ?
  • हे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले होते. आता या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे.  (EVM VVPAT)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.