IPL 2024 Yuzvendra Chahal : यजुवेंद्र चहलला बंगळुरू फ्रँचाईजीने का सोडलं?

IPL 2024 Yuzvendra Chahal : बंगळुरू संघाने ज्याला लिलावाआधी मुक्त केलं, तोच यझुवेंद्र आज पर्पल कॅपचा धारक आहे. 

84
IPL 2024 Yuzvendra Chahal : यजुवेंद्र चहलला बंगळुरू फ्रँचाईजीने का सोडलं?
  • ऋजुता लुकतुके

यंदाच्या आयपीएल हंगामात यजुवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) स्पर्धेतील २०० बळी पूर्ण केले आहेत. त्या शिवाय तो पर्पल कॅपच्या शर्यतीतही आघाडीवर आहे. पण, बंगळुरू संघाने २०२२ च्या खेळाडूंच्या लिलावापूर्वी याच यजुवेंद्र चहलला मुक्त केलं होतं. त्यानंतर तो राजस्थान रॉयल्सकडे गेला आणि आज तो संघाची एक ताकद म्हणून समोर आला आहे. उलट बंगळुरूकडे एकही कसलेला फिरकीपटू नाहीए. गोलंदाजीत कमी पडल्यामुळे बंगळुरुला सामने गमवावे लागत आहेत. (IPL 2024 Yuzvendra Chahal)

एकही फिरकीपटू संघात नसताना यजुवेंद्रला का सोडलं या प्रश्नावर संघाचे संचालक हेसन यांनी अखेर मौन सोडलं आहे. जिओ सिनेमा या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मुलाखत देताना हेसन म्हणतात, ‘योजना वेगळी होती. चहल आणि हर्षल पटेल यांना सुरुवातीला मुक्त करून हातात जास्त पैसे ठेवायचे आणि मग लिलावात त्यांना पुन्हा खरेदी करायचं असं संघ प्रशासनाचं ठरलं होतं. पण, चहलचं नाव खूप उशिरा आलं. तोपर्यंत वानिंदू हसरंगासाठी बोली लावताना संघाची दमछाक झाली. आणि अखेर चहल आणि हर्षल पटेलला पुन्हा विकत घेणं जमलंच नाही.’ (IPL 2024 Yuzvendra Chahal)

(हेही वाचा – CM Eknath Shinde : खोके मोजल्याशिवाय झोप येत नाही ते आमच्यावर आरोप करतात; मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल)

हासेन यांनी चहलविषयी बोलून दाखवल्या या भावना 

२०१९ ते २०२३ या काळात हासेन बंगळुरू संघाचे क्रिकेट संचालक होते. आताही ते फ्रँचाईजीशी संबंधित आहेत आणि चहलच्या बाबतीत जे घडलं त्याचं त्यांना अजूनही शल्य आहे. ‘मी जिवंत असेपर्यंत मला चहलबद्दल वाईट वाटत राहील. तो एक खूप चांगला गोलंदाज आहे. पण, आम्ही त्याला गमावलं,’ या शब्दात त्यांनी चहल विषयी भावना बोलून दाखवल्या. (IPL 2024 Yuzvendra Chahal)

हासेन म्हणतात त्याप्रमाणे यजुवेंद्र चहलने १५३ आयपीएल सामन्यांमध्ये २०० बळी टिपले आहेत. त्याची सरासरी २१.६० इतकी आहे. आणि सामन्यात ४ बळी टिपण्याची कामगिरी त्याने सहादा केली आहे. २०११ ते २०१३ अशी तीन वर्षं तो मुंबई इंडियन्सकडे होता. आणि २०१४ ते २०२१ पर्यंत तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे होता. या कालावधीत तो बंगळुरुचा मुख्य फिरकी गोलंदाज होता. २०२२ पासून तो राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. आणि त्याने ३९ सामन्यांत ६१ बळी मिळवले आहेत. (IPL 2024 Yuzvendra Chahal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.