Israel-Hamas Conflict: इस्रायल सैन्य गाझा पट्टीतून माघार घेणार नाही, पंतप्रधान नेत्यन्याहू यांनी हमासचा प्रस्ताव फेटाळला

नेत्यनाहू म्हणाले की, 'इस्रायल हमासच्या मागण्यांना सहमती देणार नाही. आम्ही अशा परिस्थिती कोणतीही अट स्वीकारण्यास तयार नाही.

65
Israel-Hamas Conflict: इस्रायल सैन्य गाझा पट्टीतून माघार घेणार नाही, पंतप्रधान नेत्यन्याहू यांनी हमासचा प्रस्ताव फेटाळला
Israel-Hamas Conflict: इस्रायल सैन्य गाझा पट्टीतून माघार घेणार नाही, पंतप्रधान नेत्यन्याहू यांनी हमासचा प्रस्ताव फेटाळला

इस्रायल सैन्य गाझा पट्टीतून माघार घेणार नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यन्याहू यांनी स्पष्ट केले आहे. ओलिसांच्या सुटकेच्या कराराचा एक भाग म्हणून हमासने युद्धविरामाच्या प्रस्तावाचे चिन्ह दिसत असतानाचा नेत्यनाहू यांनी असे विधान केले आहे.

उद्दिष्टे साध्य होत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच
नेत्यनाहू म्हणाले की, ‘इस्रायल हमासच्या मागण्यांना सहमती देणार नाही. आम्ही अशा परिस्थिती कोणतीही अट स्वीकारण्यास तयार नाही. हमास बटालियन त्यांच्या बंकरमधून बाहेर पडतील. गाझावर पुन्हा ताबा मिळवतील. ते त्यांच्या लष्करी पायाभूत सविधांची पुनर्बांधणी करतील. जोपर्यंत सर्व उद्दिष्टे साध्य होत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच ठेवू.’


(हेही वाचा – Onion Export: एनसीसीएफ आणि नाफेड करणार पाच लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी!)

इस्रायलने गाझामधून माघार घेण्याची हमी देणे आवश्यक
नेत्यनाहू यांनी चर्चेसाठी शिष्टमंडळ न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान हमासचे नेते इस्माईल हनीयेह यांनी शुक्रवारी, (४ मे) म्हटलं होतं की, आम्ही सर्वसमावेशक युद्धविरामापर्यंत पोहोचण्यास उत्सुक आहोत. इस्रायलने गाझामधून माघार घेण्याची हमी देणे आवश्यक आहे. तरच आम्ही पॅलेस्टिन कैंद्यांऐवजी ओलिसांची सुटका करू.


 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.