NCP राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून ‘तुतारी’चा वाद राजकीय फायद्यासाठी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून ‘तुतारी’ या चिन्हावरून निवडणूक आयोगावर पक्षापातीपणाचा केलेला आरोप हा निव्वळ राजकीय फायद्यासाठी असल्याचे उघड झाले आहे.

146
NCP राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून ‘तुतारी’चा वाद राजकीय फायद्यासाठी
  • सुजित महामुलकर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून ‘तुतारी’ या चिन्हावरून निवडणूक आयोगावर पक्षापातीपणाचा केलेला आरोप हा निव्वळ राजकीय फायद्यासाठी असल्याचे उघड झाले आहे. (NCP)

बॅन्ड पथकातील कर्णा विरुद्ध तुतारी

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी (शप) पक्षाला ‘तुतारी’ हे अधिकृत चिन्ह दिले असून बारामती मतदार संघात अन्य एका अपक्ष उमेदवारला ट्रंपेट ज्याला पिपाणी किंवा कर्णा म्हणू शकतो, हे चिन्ह दिले आहे. कर्णा सर्वसाधारणपणे ग्रामीण भागात लग्न किंवा मिरवणूक बॅन्ड पथकात पाहायला मिळते. मात्र, या ट्रंपेटचे मराठीत भाषांतर निवडणूक आयोगाकडून ‘तुतारी’ असे करण्यात आल्याने राष्ट्रवादी (शप) गटाच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगावर पक्षापातीपणाचा आरोप केला. (NCP)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : ठाकरे कुटुंब करणार काँग्रेसला मतदान ?)

दहा वर्षापूर्वीचे भाषांतर

याबाबत ‘हिंदुस्थान पोस्ट’ने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना विचारले असता त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “ट्रंपेटचे तुतारी हे भाषांतर यावर्षी प्रथमच नाही झाले, तर दहा वर्षापासून ट्रंपेटला ‘तुतारी’ असेच संबोधले जात आहे. आणि हे चिन्ह केवळ बारामती मतदार संघातील उमेदवाराला दिले असे नाही तर अन्य यवतमाळ, परभणी, हिंगोली, धारशिव, लातूर आणि सोलापूर या मतदार संघातील उमेदवारांनादेखील देण्यात आले आहे,” असे चोकलिंगम यांनी स्पष्ट केले. (NCP)

मतदान करताना चिन्ह दिसते, नाव नाही

ते पुढे म्हणाले, “ट्रंपेट हे मुक्त-चिन्ह असून त्याचे वाटप अगोदरच झाले आहे, त्यामुळे आता यावर आक्षेप नोंदवण्याची वेळ निघून गेली आहे. तसेच मतदान करताना ट्रंपेट आणि तुतारी ही चिन्हे दिसतात, त्याची नावे नाहीत. त्यामुळे नाव न दिसता चिन्ह दिसत असल्याने मतदारांचा गोंधळ होण्याचा प्रश्न नाही, कारण दोन्ही चिन्हांची तुलना होऊ शकत नाही,” असेही चोकलिंगम यांनी सांगून राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाच्या आटोपातील हवा काढून टाकली. (NCP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.