Sam Pitroda यांच्या वारसा करावरील विधानावरून PM Narendra Modi यांचा हल्लाबोल; काँग्रेस की लूट जिंदगी के साथ भी, बाद भी

तुम्ही तुमच्या हयातीत कमावलेली संपत्ती निधनानंतर जनतेसाठी सोडून दिली पाहिजे. सर्व संपत्ती नाही, परंतु, किमान निम्मी संपत्ती द्यायला हवी आणि मला हे न्याय्य वाटते, असे सॅम पित्रोदा म्हणाले.

95

ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते Sam Pitroda यांच्या वादग्रस्त विधानामुळे काँग्रेस अडचणीत सापडली आहे. पित्रोदा यांनी अमेरिकेतील वारसा कर व्यवस्था न्याय असल्याचे म्हटले, ज्यात प्रत्येकाच्या मृत्यूनंतर त्याच्या मालकीची ५० टक्के संपत्ती सरकारकडे जमा होते. याचा PM Narendra Modi यांनी खरपूस समाचार घेतला. काँग्रेस की लूट जिंदगी के साथ भी बाद भी, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

काय म्हणाले सॅम पित्रोदा? 

भारतीय अर्थव्यवस्थेबाबत बोलताना सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांनी अमेरिकेतील एका कराचा उल्लेख केला होता. “अमेरिकेत वारसा कर नावाचा एक कर आहे. एखाद्या व्यक्तीने १०० मिलियन डॉलर्स मूल्याइतकी संपत्ती कमावली असेल, तर त्याच्या निधनानंतर त्याच्या मुलांना साधारणपणे ४५ टक्के संपत्ती मिळते आणि उर्वरीत ५५ टक्के संपत्ती सरकार ताब्यात घेते. हा एक वेगळा कायदा आहे. या कायद्यानुसार, तुम्ही तुमच्या हयातीत कमावलेली संपत्ती निधनानंतर जनतेसाठी सोडून दिली पाहिजे. सर्व संपत्ती नाही, परंतु, किमान निम्मी संपत्ती द्यायला हवी आणि मला हे न्याय्य वाटते.”

(हेही वाचा शाहू शहाजी छत्रपती यांना AIMIM चा पाठिंबा; महाराज पुन्हा आले चर्चेत)

काय म्हणाले पंतप्रधान मोदी? 

शाही परिवारातील (गांधी कुटुंब) राजकुमाराच्या सल्लागारांनी (Sam Pitroda) एक वक्तव्य केले. हे सल्लागार राजकुमाराच्या वडिलांबरोबरही काम करत होते. ते कुटुंब नेहमी या सल्लागाराचे सल्ले ऐकतो. ते सल्लागार म्हणाले, आपल्या देशातील मध्यमवर्गीय लोक मेहनत करून पैसे कमावतात त्या पैशावर अधिक कर लावायला हवा. आता हे लोक त्याहून एक पाऊल पुढे गेले आहेत. त्यांच म्हणणे आहे की ते आता देशात वारसा कर लावतील. म्हणजेच आई-वडिलांकडून मिळणाऱ्या वारशावरही ते कर लावतील. याचा अर्थ तुम्ही मेहनत करून जी संपत्ती जमवता, ती संपत्ती किंवा ते पैसे तुमच्या मुलांना मिळणार नाहीत. कारण काँग्रेस सरकारचा पंजा ते पसे तुमच्याकडून हिसकावेल. या काँग्रेस पक्षाचा एक मंत्र आहे. काँग्रेस की लूट जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. म्हणजे तुम्ही जीवंत आहात तोवर काँग्रेस तुमच्यावर जास्तीत जास्त कर लावून तुम्हाला मारून टाकेल आणि तुम्ही जीवंत नसाल तेव्हा तुमच्या मुलांवर वारसा कराचा ओझे टाकेल. ज्यांनी आपला संपूर्ण पक्ष पित्रूसंपत्ती म्हणून आपल्या मुलांना दिला आहे तेच लोक तुमची संपत्ती तुमच्या मुलांना देण्यापासून रोखण्याच्या विचारात आहेत. तुम्ही मेहनतीने कमावलेले पैसे तुमच्या मुलांना मिळू नये असे काँग्रेसला वाटते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.