Sharad Pawar यांच्या ‘त्या’ विधानांवर सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर

बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत सुरू आहे. यामध्ये शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी पवार घराण्यातच लढत होत आहे.

229
शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रचारसभेत बोलताना सुनेत्रा पवार यांचा उल्लेख बाहेरून आलेले पवार, असा केला. त्यानंतर शरद पवार टीकेचे धनी बनले आहेत. याप्रकरणी महायुतीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच माध्यमांनी सुनेत्रा पवारांना याबाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले मात्र त्यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.

सुनेत्रा पवार यांना बाहेरून आलेल्या व्यक्ती म्हटले 

बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत सुरू आहे. यामध्ये शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी पवार घराण्यातच लढत होत आहे. पवार विरुद्ध पवार या लढाईत पवार या आडनावाच्या व्यक्तीलाच निवडून देण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले होते. तर त्याला शरद पवार  (Sharad Pawar) यांनी देखील प्रत्युत्तर दिले होते. एक घरातील पवार आणि बाहेरून आलेले पवार, या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. मात्र, शरद पवार यांनी सून सुनेत्रा पवार यांना बाहेरून आलेल्या व्यक्ती म्हटल्यामुळे त्यांच्यावर आता राज्यभरातून टीका होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने देखील शरद पवार (Sharad Pawar) यांच्या या भूमिकेवर प्रतिहल्ला केला आहे. यासाठी त्यांनी राजमाता जिजाऊ यांचे उदाहरण समोर ठेवले आहे. राजमाता जिजाऊ या मालोजीराव भोसले यांच्या सून होत्या. तर म्हाळसाबाई जाधव आणि लखोजी जाधव यांच्या कन्या होत्या. मात्र त्यांनी भोसले घराण्यात कर्तबगार सून म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा योद्धा घडवला, असे म्हणत अजित पवार गटाने शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.