Sugar Factory : राज्यातील साखर कारखान्यांना सरकारची भरघोस मदत; अशोक चव्हाण यांच्यासह कोणकोणत्या नेत्यांच्या कारखान्यांचा सहभाग?

राष्ट्रीय सहकारी विकास निगमच्या माध्यमातून भाजप नेत्यांच्या कारखान्यांना जीवदान दिल्यानंतर आता अजित पवार यांनी देखील त्यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांच्या कारखान्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मदत मिळवून देत जीवदान दिले आहे.

138

सध्या राज्यातील काही ठराविक साखर कारखान्यांचे (Sugar Factory) दिवस चांगले आले आहेत. त्याला कारणही तसेच आहे. राज्यातील काही कारखान्यांना सरकारकडून कोट्यवधींची आर्थिक मदत करण्यात आली आहे. त्यामध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपात आलेले अशोक चव्हाण यांच्यासह अजित पवार यांच्या समर्थक आजी-माजी आमदारांच्या साखर कारखान्यांना भरघोस आर्थिक मदत करण्यात आली आहे आहे.

अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला (Sugar Factory) राज्य सहकारी बँकेकडून (Maharastra State Co-Op Bank ) 147.79 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. याचसोबत अजित पवार यांना पाठिंबा देणारे कल्याण काळे, अमरसिंह पंडित आणि प्रशांत काटे यांना देखील राज्य सहकारी बँकेकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे. याआधी राष्ट्रीय सहकारी विकास निगमचा माध्यमातून भाजप नेत्यांच्या कारखान्यांना जीवदान दिल्यानंतर आता अजित पवार यांनी देखील त्यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांच्या कारखान्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मदत मिळवून देत जीवदान दिले आहे.

(हेही वाचा Teele Wali Masjid Case : आता ‘या’ मशिदीच्या प्रकरणात मुस्लिम पक्ष हादरला; न्यायालयाने फेटाळली याचिका)

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मदत केलेले कोणते आहेत साखर कारखाने?

  • अशोक चव्हाण यांचा भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना – 147.79 कोटी
  • धनाजीराव साठे यांचा संत कुरुमदास सहकारी कारखाना – 59.49 कोटी
  • कल्याणराव काळे यांचा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखाना – 146.32 कोटी
  • प्रशांत काटे यांचा छत्रपती सहकारी साखर कारखाना – 128 कोटी
  • अमरसिंह पंडित यांचा जय भवानी सहकारी साखर कारखाना – 150 कोटी

एनसीडीसी मार्फत जीवदान मिळालेले भाजप नेत्यांचे कारखाने

  • विजयसिंह मोहिते पाटील यांचा शंकर सहकारी साखर कारखाना – 113.42 कोटी
  • हर्षवर्धन पाटील यांचा कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखाना – 150 कोटी
  • हर्षवर्धन पाटील यांचा निरा भिमा सहकारी साखर कारखाना – 75 कोटी
  • अभिमन्यू पवार यांचा शेतकरी सहकारी साखर कारखाना – 50 कोटी
  • रावसाहेब दानवे यांचा रामेश्वर सहकारी साखर कारखाना – 34.74 कोटी
  • धनंजय महाडिक यांचा भीमा सहकारी साखर कारखाना – 126.38 कोटी

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.