छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ “विशेष नाणे” काढण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी : सुधीर मुनगंटीवार

224
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ "विशेष नाणे" काढण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी : सुधीर मुनगंटीवार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने विशेष स्मारक नाणे काढून त्यामध्ये सोन्याचा वापर करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे मंगळवारी १२ जुलै रोजी केली. वस्तू व सेवाकर परिषदेच्या ५० व्या बैठकीचे आयोजन विज्ञान भवन येथे आज करण्यात आले. या बैठकीसाठी मुनगंटीवार उपस्थित होते. बैठकीच्या मधल्या वेळात मुनगंटीवार यांनी निर्मला सितारामन यांना निवेदन देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक स्मरणार्थ जारी करण्यात येणाऱ्या नाण्यामध्ये सोन्याचा वापर करण्याबाबत परवानगीची मागणी केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे हे वर्ष आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने राज्यभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वर्षभर साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत २ जून २०२३ रोजी भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन किल्ले रायगडावर आठवडाभर करण्यात आले. या उत्सवाचा एक भाग म्हणून, महाराष्ट्र शासनाने भारतीय टपाल विभागाच्या सहकार्याने एक विशेष टपाल तिकीट नुकतेच जारी केले. राज्याभिषेक वर्षानिमित्ताने स्मारक नाणे जारी करण्याचा प्रस्ताव यापूर्वी केंद्रिय वित्त मंत्रालयाकडे दिलेला आहे, अशी माहिती  मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

(हेही वाचा – Chitra Wagh : चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाल्या…)

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्यावेळी सोन्याचे, चांदीचे आणि तांब्याचे “होन” काढले होते. या होनची प्रतिकृती असलेले विशेष नाणे ३५० व्या राज्यभिषेकाच्या स्मरणार्थ जारी करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. हे नाणे भारतीय रिर्झव्ह बँकेच्या माध्यमातून काढून ते जनतेला उपलब्ध करून द्यावे. या नाण्यांनमध्ये सोन्यासह अन्य धातूंचा वापर केला जाईल असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. या महत्त्वाच्या प्रस्तावाला जलद मंजुरी देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात याव्यात, अशी विनंती मुनगंटीवार यांनी केली. यावर केंद्रीय वित्त मंत्री यांनी सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.