Chitra Wagh : चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाल्या…

99

उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी नागपुरातल्या सभेदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर “अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे हा” असे म्हणत जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी ‘तुम्हाला दारोदार फिरावं लागत आहे यावरून तरी ओळखा कलंक कोण आहे’, असे ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

चित्रा वाघ ट्वीट करत म्हणाल्या की, “उद्धव ठाकरे जी खरं बोलताय, काळ हा निघृण असतो. हे तुमच्यापेक्षा चांगलं कोणाला माहित असणार. बघा ना तुमच्याकडे काय नव्हतं..?? पद पैसा मान सन्मान विचारधारा. जोपर्यंत भाजप सोबत तुम्ही होतात तोपर्यंत सगळं होतं. पण जेव्हा तुम्ही मुख्यमंत्रीपदाच्या लालसेनं देवेंद्रजींना दगा दिलात तेव्हा पासून नियती तुमचा सूड उगवतेय. तुम्हाला दारोदार फिरावं लागत आहे यावरून तरी ओळखा कलंक कोण आहे’, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यासाठी उच्चारलेल्या ‘कलंक’ या शब्दावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक ठिकाणी उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलने होत असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही पत्रकारपरिषदेत उद्धव ठाकरेंविरोधात तिव्र आंदोलन करण्याचा थेट इशारा दिला आहे.

(हेही वाचा Devendra Fadanvis : ‘माझे माजी मित्र उद्धव ठाकरेंना मानसोपचारांची गरज’, ‘कलंक’ टीकेवरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.